अर्चना जोशी

अगदी दिवाळी, गणपती एवढय़ा प्रमाणात नसला, तरी नाताळ आता घरोघरी कमी-अधिक प्रमाणात साजरा केला जाऊ लागला आहे. या सणाचे सर्वात महत्त्वाचे प्रतीक म्हणजे ख्रिसमस ट्री. घरातील सजावटीसाठी किंवा शाळेच्या कार्यानुभवासाठी ख्रिसमस ट्री अगदी सहज तयार करता येईल. कसे ते पाहूया..

साहित्य

आइस्क्रीमच्या काडय़ा, ग्लिटर सेलोटेप, साधी सेलोटेप, जिलेटीन कागद, गम आणि कात्री

कृती :

  • आइस्क्रीमच्या काडय़ांचे समान आकारचे दोन भाग करा.

* तीन तुकडे त्रिकोणात जोडा. असे ३-४ त्रिकोण तयार करा.

* मागील बाजूला जिलेटीन कागद चिकटवा.

* त्रिकोण एकमेकांना जोडून खालील बाजूला छोटी आइस्क्रीमची काडी जोडा.

* त्रिकोणाच्या काडय़ांवर हिरवी ग्लिटर सेलोटेप चिकटवा.

* दोन्ही बाजू अशाच प्रकारे सजवा.

* या झाडांचा वापर बुकमार्क म्हणून करता येईल.

* अशाच पद्धतीने बरीच झाडे तयार करून ती सॅटिन रिबनला चिकटवून हे तोरण भिंतीवर लावता येईल.

* त्या सर्व झाडांवर बुंध्याला संदेश जोडून शुभेच्छापत्र म्हणून पाठवता येईल.

* एखाद्या कागदी ग्लासचा कुंडीप्रमाणे वापर करून त्यात हे झाड लावता येईल.

apac64kala@gmail.com

Story img Loader