लाडक्या गणरायाचे मखर सजवण्यासाठी नवनवीन कल्पनांच्या शोधात आहात का? मग एक एकदम सोपी आणि तेवढीच आकर्षक कलाकृती शिकू या. पावसाळ्यात मक्याची कणसे अगदी आवडीने खाल्ली जातात. या कणसांभोवती असलेली हिरवट पाने अतिशय आकर्षक असतात. ती सामान्यपणे कचऱ्यात जातात. त्यांचा पुनर्वापर करू या..

साहित्य :

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
Ratnagiri, CNG tanker Ratnagiri, gas leak tanker Ratnagiri, Ratnagiri,
रत्नागिरीत सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती

कणसाची वाळकी पाने, कापसाचे वाळके बोंड किवा चिंचेची साल, अ‍ॅक्रेलिक रंग, ब्रश व रंगकामाचे साहित्य, हिरवी क्रेप टेप, गम (फेव्हिबाँड.)

कृती

*      एका आकाराची कणसाची वाळकी पाने घ्या. एका कणसाची साधारण २०-२५ पाने निघतातच.

*      त्याच्या ४-५ मोठय़ा पानांचा एक फुलोरा तयार करा.

*      अ‍ॅक्रेलिक रंगाने कापसाचे बोंड व चिंचेचे साल रंगवा व नीट वाळू द्या.

*      कणसाच्या पानाच्या द्रोंणामध्ये हे रंगवलेले कापसाचे बोंड व चिंचेचे साल यांची आकर्षक पद्धतीने रचना करा.

*      सर्व एकत्र करून गुच्छ बांधा आणि गमने चिकटवा. उरलेल्या कडा लपवण्यासाठी हिरवी क्रेप टेप गुंडाळा.

*      मखराच्या वरच्या भागात ठेऊ शकता किंवा गणपतीसमोर एखाद्या फुलदाणीतही सजवू शकता.

*      सेट बनवून भेटवस्तू म्हणून द्यायला वापरू शकता.

Story img Loader