अर्चना जोशी

कागदाचे खोके कडक व जाड असतात. त्यातील वस्तू वापरून आपण ते फेकून देतो. आज आपण त्यांचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूया. मुलांच्या टेबलवरचा पसारा आवरण्यास याची मदत नक्कीच होईल.

साहित्य :

गम, कात्री, तीन जाड कागदी खोके, रंगीत स्ट्रॉ, लेस, डबल साइड टेप, स्टेपलर इत्यादी.

कृती :

*      तीन जाड कागदी खोक्यांच्या वरच्या बाजूस असलेल्या दुमडी कापा.

*      सर्व खोके एकत्र जोडा. मधल्या रिकाम्या जागा शंकरपाळ्यांच्या आकारात राहतील अशा प्रकारे स्टेपलरच्या साहाय्याने जोडा.

*      चिकटवून घेतल्यास उत्तम.

*      बाहेरील बाजूस वेगवेगळ्या रंगाच्या स्ट्रॉ आकर्षक पद्धतीने चिकटवा.

*      सगळ्या बाजू स्ट्रॉ चिकटवून झाकून टाका.

*      बाजूस डबल साइड टेप चिकटवा.

*      त्या टेपवर लेस चिकटवा व खालील बाजूस पुन्हा एक टेप लावा. त्यावर लेस चिकटवा.

*      घरात इकडेतिकडे पडलेले पेन, पेन्सिली, रंगकामाचे ब्रश, पट्टय़ा अशा वस्तू आवरून ठेवता येतील. टेबलवर ठेवलेला हा खोका आकर्षक तर दिसेलच शिवाय सर्व वस्तू एकाच ठिकाणी सहज मिळतील.

*      छोटय़ांच्या वाढदिवसाच्या पार्टीत आलेल्या पाहुण्यांना असे खोक्यांचे पेनस्टँड भेटवस्तू म्हणून देता येतील.

Story img Loader