कृती

* भोपळा चिरून त्याचे लहान तुकडे करा. साले आणि बिया काढून घ्या. आता भोपळा, कांदा आणि लसणीच्या पाकळ्या एका भांडय़ात घाला. त्यात पाणी ओता आणि गॅसवर हे मिश्रण शिजू द्या. यातच व्हेजिटेबल स्टॉकही घाला. सर्व मिश्रण शिजल्यावर गार करायला ठेवा. थंड झाल्यावर ब्लेंडरमधून छान वाटून घ्या. यात आवडीनुसार मीठ, मिरपूड घाला आणि आता हलक्या आचेवर गरम करा. क्रीम घालून गरमागरम प्या.

साहित्य

* १ किलो भोपळा, * १ चिरलेला कांदा,

* २-३ लसूण पाकळ्या, * ३ कप व्हेजिटेबल स्टॉक, * १ कप पाणी,

* मीठ, * मिरपूड, * १ चमचा क्रीम.

Story img Loader