अर्चना जोशी

पूर्वी आदिवासी पाडय़ांत घराच्या भिंतींवर काढली जाणारी वारली चित्रे आता शहरातील आलिशान घरांत, तारांकित हॉटेलांत, पोषाखांत, बेडशिट्स, पर्सेस अशी सर्वत्र पोहोचली आहेत. अनेक वर्षे फारशी कोणाला माहीतच नसलेली कला आता कलाभ्यासक खास प्रशिक्षणवर्गात जाऊन आत्मसात करू लागले आहेत. आदिवासी समाज, त्यांच्या चालीरीती, त्यांचे निसर्गाशी असलेले घनिष्ट नाते अशा अनेक विषयांना स्पर्श करणारी ही कला आज थोडय़ा वेगळ्या रूपात मांडून पाहू या.

साहित्य :  रंगीत कागद, गम, झिगझॅग कात्री, साधी कात्री,  डबल साइड टेप, स्केचपेन, पेपर क्विलर, पेन्सिल, कार्डपेपर इत्यादी.

कृती

*      सारख्या जाडीच्या व रुंदीच्या रंगीत पट्टय़ा कापा.

*      कार्डपेपरवर साधारण काय चित्र हवे आहे, ते रेखाटून घ्या.

*      कापलेल्या पट्टय़ांपासून गोल, त्रिकोण, चौकोन, लंब आयात, अर्धगोल आकार पेपर क्विलरने बनवून घ्या.

*      चित्रात काढल्याप्रमाणे एक एक आकार चिकटवा.

*      काही आकार न जमल्यास तुम्ही ते स्केचपेनने रेखाटू शकता.

*      साध्या चित्राला टू डी आयाम देता येईल.

*      आपल्या पारंपरिक वारली चित्रकलेला हस्तकलेच्या स्वरूपात सादर करता येईल.

*      शुभेच्छापत्र तयार करू शकता किंवा फ्रेम करून भिंतीवर लावू शकता.

*      कागदांचा पुनर्वापर करा.

apac64kala@gmail.com

Story img Loader