उन्हाळा संपून लवकरच सुरू होणाऱ्या पावसाचे वेध अनेकांना लागले आहेत. या काळात प्रत्येकाला सुखद वाटणारा असा पावसाळा हिरवाईने नटलेला असतो. अशा या पावसाळ्यात आपल्यापैकी अनेक जण निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यास जाण्याचे बेत आखतात. पावसाळ्यात, गड-किल्ल्यांवर फिरण्यासाठी जाणारे तसेच दुचाकीवरून दूरवरच्या सफरीवर जाणाऱ्या फिरस्त्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान पावसाळ्यात फिरताना पर्यटकाला मोबाइलवरून व्हिडीओ किंवा फोटो काढणे अनेकदा जिकरीचे जाते. अशावेळेस कामी येतो तो अद्ययावत यंत्रणा आणि हाताळण्यास साजेसा असणारा असा पाणीरोधक अॅक्शन कॅमेरा, या अशा कॅमेऱ्यांची बाजारात मोठी चलती असून अनेक जण छायाचित्रणाचा छंद जोपसण्यासाठी मोठय़ा डीएसएलआर कॅमेऱ्याऐवजी एका हातात माऊ शकेल अशा अॅक्शन कॅमेऱ्याची खरेदी करण्यास प्राधान्य देतात. बाजारात सुप्रसिद्ध असणाऱ्या अशा अॅक्शन कॅमेऱ्याविषयी जाणून घेऊयात..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा