भगवान शंकराचा गण असलेल्या वीरभद्र या नावावरून या आसनाला वीरभद्रासन असे नाव पडले आहे. इंग्रजीमध्ये या आसनाला वॉरिअर पोझ असे म्हटले जाते. या आसनाचे दोन प्रकार आहेत. सध्या आपण वीरभद्रासन १ हा प्रकार पाहू. या आसनामुळे हात, खांदे, गुडघे, मांडय़ा आणि कंबरेचे स्नायू बळकट होतात.
कसे करावे?
आणखी वाचा
* दोन्ही पायांमध्ये तीन ते चार फुटांचे अंतर ठेवा आणि सरळ उभे राहा.
* उजवा पाय मागच्या बाजूला घेऊन थोडा पसरवा. हा पाय पसरवताना गुडघ्यात दुमडला नाही पाहिजे.
* डावा पाय पुढे करून गुडघ्यात दुमडवा.
* दोन्ही हात सरळ हवेत पसरवा. हाताचे तळवे वरच्या बाजूला असावेत.
* थोडा वेळ याच स्थितीत राहा. नंतर श्वास घेत सामान्य स्थितीत या.
* आता हेच आसन डाव्या बाजूने करावे.