दीपा पाटील

साहित्य

१०-१२ सुके बोंबील, ४ कांदे (लांब चिरलेले), चिरलेली सागरमेथी १ वाटीभर, ४ हिरव्या मिरच्या, १ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, २ चमचे चिंचेचा कोळ, १ टोमॅटो (बारीक चिरलेला), पाव कप तेल, चवीनुसार मीठ.

कृती

सर्वात आधी बोंबील धुऊन १० मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. त्यानंतर हे भिजवलेले बोंबील बारीक चिरून घ्यावेत. कढईत तेल तापवून त्यात कांदा-मिरची परतून घ्यावे. यानंतर त्यात बारीक चिरलेली मेथी घालून त्यात हळद, लाल तिखट व मीठ घालून परतावे. मग त्यात टोमॅटो आणि बोंबील टाकावेत. याला एक वाफ आणावी. त्यानंतर त्यात चिंचेचा कोळ घालून पुन्हा एक वाफ आणावी आणि गरमागरम भाकरीसोबत गट्टम करावे.

Story img Loader