डॉ. शुभांगी महाजन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजची तरुण पिढी स्वत:ची त्वचा आणि चेहरा कसा तजेलदार आणि टवटवीत दिसेल याबद्दल खूप जागरूक आहे. मात्र धकाधकीचे जीवन, रात्रीचे जागरण, सततचा प्रवास आणि प्रदूषण यांमुळे त्वचा, केस किंवा अन्य समस्या निर्माण होतात. यासाठी सौंदर्यविषयक विविध उपचारपद्धतींची माहिती देणारे सदर..
केमिकल पीलिंग ही आजच्या तरुण पिढीमध्ये प्रसिद्ध असलेली एक सौंदर्य उपचारपद्धती आहे. त्वचारोग आणि सौंदर्यतज्ज्ञही आपल्या रुग्णांच्या त्वचेवर तजेलदारपणा आणण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी केमिकल पीलिंगचा पुरेपूर उपयोग करताना दिसतात.
केमिकल पील म्हणजे काय?
केमिकल पील ही काही द्रव्ये आहेत, जी नैसर्गिक गोष्टींच्या (उदा. दूध, फळांमधील सौम्य अॅसिड्स, किंवा शेवाळी वनस्पती) अर्कापासून बनवली जातात. ही द्रव्ये त्वचेवर योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत लावल्यामुळे त्वचेचा मृत थर निघायला मदत होऊन त्वचा तजेलदार आणि टवटवीत होते.
वापर कुठे आणि कसा?
केमिकल पील वेगवेगळ्या त्वचा समस्यांसाठी वापरले जातात. उदा. त्वचेवरील काळे डाग, वांगाचे डाग, मुरुम, सुरकुत्या, उन्हामुळे होणारे टॅनिंग, मुरुमांमुळे होणारे खड्डे आणि अँटीएजिंग या सर्व समस्यांवर उपचार करताना कोणते केमिकल पील किती प्रमाणात आणि किती वेळेसाठी वापरावे हे तुमचे त्वचारोग किंवा सौंदर्यतज्ज्ञ ठरवतात. तुमच्या त्वचेच्या समस्या आणि त्वचेचा प्रकार लक्षात घेऊनच केमिकल पीलचा प्रकार आणि मात्रा ठरवली जाते.
केमिकल पीलचे प्रकार आणि उपयोग
१) सॅलिसायलिक अॅसिड पील – मुरुमांसाठी
२) ग्लायोलिक अॅसिड पील – काळे डाग; वांगाचे डाग, सनटॅनिंग
३) लॅक्टिक अॅसिड पील – सनटॅनिंग, ग्लो, अँटीएजिंग
४) रेटिनॉल पील (यलो पील) – काळे डाग, सनटॅनिंग, अँटीएजिंग याशिवाय अनेक पील सध्या उपलब्ध आहेत.
घ्यावयाची काळजी –
केमिकल पील करण्यापूर्वी तुमची त्वचा व्यवस्थित मॉइश्चराइज्ड करणे गरजेचे आहे. केमिकल पील केल्यानंतर ५ ते ७ दिवस फक्त माइश्चराइजर आणि सनस्क्रीन त्वचेवर लावावे. कोणतेही तीव्र साबण, फेश वॉश किंवा क्रीम त्वचेवर लावू नयेत. कडक उन्हात जास्त वेळ बाहेर निघू नये.