|| दीपा पाटील
साहित्य – २ कप खेकडय़ाचे मास, अर्धा कप ब्रेडचा चुरा, ४ चमचे मेयोनिज, पाव चमचा मोहरी पूड, पाव चमचा मिरपूड, १ चमचा लसूण पेस्ट, १ चमचा चिली फ्लेक्स, कोथिंबीर, १ अंडे, मैदा, तेल आणि मीठ.
आणखी वाचा
कृती – मेयोनिजमध्ये मोहरी पूड, मिरपूड, लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, अंडे आणि मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे. नंतर त्यात खेकडय़ाचे मांस आणि ब्रेडचा चुरा घालून छान एकत्र करावे. अर्धा तास हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे. नंतर त्याचे लिंबाएवढे गोळे करून त्याला पॅटिसचा आकार द्यावा. ते मैद्यात घोळवून तेलात तळावे.