साहित्य
१७५ ग्रॅम चिरलेली काकडी, ४५मिली लिंबाचा रस, बेसिलची ३ पाने, १५ ग्रॅम आले, ३५ मिली आल्याचा रस, बर्फ.
कृती
लिंबू चिरून लिंबाचा रस काढा. चिरून झाल्यावर लिंबाची फोड एका कॉकटेल शेकर मध्ये घाला. याच शेकरमध्ये काकडी, बेसिल व आले घाला. ते चांगले खलून घ्या. मग त्यात बर्फ, लिंबाचा रस आणि आल्याचा रस घालून हलवून मिश्रण करून घ्या. आता हे ग्लासामध्ये ओता. आलंवाली कूलर काकडी तयार.