दीपा पाटील

साहित्य

हरभरा डाळ १ कप, गूळ १ कप, वेलची पूड १ चमचा, जायफळ पूड १ चमचा, गव्हाचे पीठ २ कप, तेल तळण्यासाठी, मीठ चवीनुसार.

कृती

हरभरा डाळ चार ते पाच तास भिजवल्यानंतर शिजवून घ्या. शिजल्यावर त्यातील पाणी निथळून घ्या. त्यात गूळ टाकून तो विरघळेपर्यंत शिजवून घ्या. त्यात वेलची, जायफळ पूड टाका. हे सारण चांगले थंड  करून घ्या. किचिंत मीठ टाकून घट्टसर कणिक मळून घ्या. नंतर त्याच्या जाडसर पोळ्या लाटून त्यात वरून सारण भरा. त्यास करंजीप्रमाणे मोडून तेलात लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या. डाळीच्या पुण्ण्या व पुरणपोळ्या हा प्रकारही वळजायला जाण्यासाठी, त्या नेऊन सुकटीची खरेदी केली जायची.

Story img Loader