दीपा पाटील
साहित्य : ४ उकडलेली अंडी, २ चमचे कोथिंबीर चटणी, २ चमचे नारळाची लाल चटणी, १ कप बेसन, अर्धा चमचा हळद, पाव चमचा ओवा, मीठ, पाणी आणि तळण्याकरता तेल.
हिरव्या चटणीमध्ये कोथिंबिरीसोबत मिरच्या, लसूण, धणे यातील साहित्य आवडीप्रमाणे वापरता येईल. तर लाल चटणीमध्ये नारळ आणि लाल मिरच्यांचा वापर करता येईल.
कृती : उकडलेल्या अंडय़ाच्या गोल चकत्या करा. एका चकतीला हिरव्या रंगाची कोथिंबिरीची चटणी लावा तर दुसऱ्या चकतीला नारळाची लाल चटणी लावा. सँडविचप्रमाणे त्या एकमेकांवर ठेवून थर तयार करा. अशा प्रकारे २-२ चकत्यांचे थर तयार करा. आता बेसन, ओवा, हळद, मीठ आणि पाणी एकत्र करून भज्यांच्या पिठाप्रमाणे सरसरीत भिजवून घ्या. चकत्यांचे थर या पिठात बुडवून भज्यांप्रमाणे तळून घ्यावे. सॉससोबत फस्त करावे.