साहित्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

६ मोठी अंडी, २ अंडय़ांचे बलक, अर्ध्या कपापेक्षा दोन चमचे अधिक साखर, पाव चमचा मीठ, ४ कप म्हशीचे दूध, १ मोठा चमचा व्हॅनिला अर्क, अर्धा चमचा जायफळाची पूड, पाव कप उत्तम फेटलेली मलई, सजावटीसाठी थोडी जायफळाची पूड.

कृती

एका पसरट भांडय़ात अंडी, अंडय़ाचे बलक, साखर आणि मीठ घ्यावे. ते मिळून येईपर्यंत फेटावे. आता दूध हळूहळू घालावे. व्यवस्थित मिसळेपर्यंत फेटावे. मंद गॅसवर हे भांडे ठेवावे. मिश्रण चमच्याला चिकटेपर्यंत हे ढवळत राहावे. यासाठी ते जवळपास पाऊण ते एक तास ढवळावे लागते. एका भांडय़ात मिश्रण गाळावे. त्यात व्हॅनिला अर्क, जायफळाची पूड घालावी. आता हे मिश्रण काचेच्या भांडय़ात ओतावे. फ्रीजमध्ये कमीतकमी ४ तासांसाठी ठेवावे. आता मलई उत्तम फेटून घ्यावी. ती या मिश्रणामध्ये एकजीव होईल, अशाप्रकारे मिसळून घ्यावी. एका कपमध्ये हे थंडगार मिश्रण घालून त्यावर जायफळाची पूड भुरभुरावी.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eggnog recipe