साहित्य

१० लहान चमचे चहा पूड, दालचिनीच्या ४ काडय़ा, पाव कप पिठी साखर, पाऊण लिटर पाणी, बर्फ.

कृती

चहापूड आणि दालचिनीच्या काडय़ा पातेल्यात घ्या. त्यात पाणी घालून ५ मिनिटे उकळी काढा. आपल्याला ज्याप्रमाणे गोड चव हवी असेल त्याप्रमाणे त्यात साखर मिसळा. ५ मिनिटे चहा उकळून गार करायला ठेवा. तो गाळून घ्या. मिश्रण गार झाल्यानंतर एका उंच पेल्यामध्ये हा चहा ओता. त्यात बर्फ भरून पेश करा.

Story img Loader