पूर्ण भारतभर हा पदार्थ होतो. नावं वेगवेगळी असू शकतात पण कृती एकच. या गुलगुल्यांमध्ये तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे काजू-बदाम घालू शकता, पण खरी मजा साध्या कृतीतच आहे.

साहित्य –

जाडसर दळलेली कणीक, गूळ, पाणी, वेलची/बडीशेप, तळण्यासाठी तूप किंवा तेल.

कृती –

पहिल्यांदा गूळ कोमट पाण्यात विरघळवून घ्यावा. याच कोमट पाण्यात कणीक सरसरीत भिजवावी. साधारण भज्याच्या पिठाइतपत असावे. त्याचे चमच्याने गोळे पडले पाहिजेत. तूप किंवा तेल कडकडीत तापवून हे गुलगुले खरपूस तळून घ्यावेत.

Story img Loader