डॉ. सारिका सातव
सामग्री :
तुकडे केलेले बदाम, अक्रोड आणि पिस्ते प्रत्येकी पाव वाटी, मनुके पाव वाटी, वेलची पावडर चिमूटभर, मीठ चिमूटभर, गूळ पाव वाटी, तीळ एक मोठा चमचा, तुकडे केलेले शेंगदाणे पाव वाटी, ओट्स अर्धी वाटी, एक चमचा तूप, एक चमचा तेल.
कृती :
* सुका मेवा, शेंगदाणे, तीळ, कढईत मंद आचेवर स्वतंत्रपणे भाजून घ्यावेत.
* गरम कढईत तूप घालावे. तूप पातळ झाल्यावर त्यात गूळ घालावा.
* गूळ पातळ झाल्यावर उरलेले सर्व साहित्य त्यात घालून एकत्र करावे. त्यानंतर गॅस बंद करावा.
* ताटाला तेल लावून सर्व मिश्रण ताटामध्ये सारखे पसरवावे.
* वडय़ा पाडाव्यात आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
विशेषत:
* – ही चिक्की लहान मुले, गर्भवती, कृश व्यक्ती यांच्यासाठी उत्तम पदार्थ.
– खेळाडू किंवा जास्त शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी उत्तम.
– डब्यात नेण्यासाठीही उपयुक्त