या आसनात शरीर अध्र्या नांगराप्रमाणे दिसते. मधुमेह, उच्चरक्तदाब, मूळव्याध, बद्धकोष्ट इत्यादी आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रकार केल्यास फायदा होतो.

कसे करावे?

* पाठ जमिनीला टेकवून हात, पाय जमिनीवर सरळ रेषेत राहतील, अशा स्थितीत झोपा.

* दोन्ही पाय एकमेकांना जुळवून गुडघ्यांत न वाकवता हळूहळू वर नेत ३० अंशांच्या कोनात आणा.

* काही क्षण तसेच राहून नंतर पाय ६० अंशांच्या कोनात आणा.

* पाय आणखी वर नेत काटकोणात आणा.

* ही आसनाची अंतिम स्थिती आहे. यात कमरेपासून खांद्यांपर्यंतचा भाग सरळ असणे आवश्यक आहे.

* सहज शक्य असेल तेवढा वेळ या स्थितीत राहा. त्यानंतर डोके वर येणार नाही याची काळजी घेत पाय हळूहळू पुन्हा जमिनीवर आणा.

Story img Loader