शुभा प्रभू-साटम
साहित्य
आणखी वाचा
जाड तांदूळ (उकडा नाही) दोन वाटय़ा, उडीद डाळ एक वाटी, चणा डाळ अर्धा वाटी, मेथी दाणे आणि जिरे अर्धा-अर्धा चमचा.
कृती
डाळी आणि तांदूळ आदल्या दिवशी सकाळी वेगवेगळे भिजत घाला. साधारण पाच ते सहा तास भिजल्यानंतर वाटून घ्या. डाळी मुलायम वाटा पण तांदूळ जरा खसखशीत ठेवा. सर्व एकत्र करून व्यवस्थित फेटून घ्या. फार घट्ट ठेवू नये. ओतण्या इतपत ठेवा. मीठ आणि किंचित साखर घालून सात-आठ तास आंबवण्यासाठी झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी अलगद सारखे करून, तव्यावर तेल घालून मध्यम आंबोळ्या काढाव्यात. फार जाड असू नयेत. कोकणी आंबोळ्या साधारण तळहातापेक्षा थोडय़ा मोठय़ा असतात. घातल्यावर झाकण ठेवा की सुरेख जाळी पडते. दोन्ही बाजूंनी लालसर शेकून खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्या.