१२० मिली ताजी गरम कॉफी. अर्धा चमचा ब्राऊन शुगर, ६० मिली आयरिश सिरप, ३ चमचे ताजे घट्ट क्रीम किंचित फेटलेलं.
कृती : ज्या कपात आपण ही कॉफी देणार आहोत त्यात कढत पाणी घाला. ते काढून टाका म्हणजे हा कप छान गरम होईल. लगेचच त्यात गरम कॉफी ओता. साधारण पाऊण कप भरेल एवढी गरम कॉफी त्यात ओता. यामध्ये ब्राऊन शुगर घालून घ्या. ती छान विरघळली की मग त्यात आयरिश व्हिस्की घाला. आता चमच्याच्या मागच्या बाजूने हळूहळू फेटलेलं क्रीम ग्लासमध्ये सोडा. गरमागरम कॉफी प्यायला द्या.