प्लास्टिकबंदी लागू झाल्यामुळे आता घरातल्या प्लास्टिकच्या वस्तूंचं काय करायचं असा प्रश्न पडला असलेच. घरात शीतपेय पिण्यासाठी जर स्ट्रॉ आणून ठेवले असतील तर ते कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा त्यांचा वापर करून एक मस्त कलाकृती तयार करू शकता.
साहित्य –
वळणदार स्ट्रॉ ४ रंगाचे, कात्री, सुई व दोरा.
कृती
* ४ रंगांचे स्ट्रॉ वळणापर्यंत मधून कापून दोन भाग करा.
* बाहेरील बाजूस एकमेकांत गुंडाळा. वळणदार बाजूपर्यंत येऊ द्या.
* जास्तीची टोके कापा व चौकोनी आकार द्या.
* ४ चौकोन बनवून घ्या.
* दोन चौकोन एकमेकांत कोनांच्या बाजूंना जोडा.
* सुई-दोऱ्याने सरळ एक गाठ शिवा. पातळ प्लास्टिक असल्याने सहज शक्य आहे.
* सर्व चौकोन एकमेकांच्या कोनात जोडून शिवा.
* इतर साहित्य वापरून सुशोभित करता येईल.
* सण समारंभासाठी घर सजावट म्हणून वापर करता येईल.
* करून बघा. मज्जा येईल.
apac64kala@gmail.com