कोकम म्हणजे ‘कूल’ भावना. नुसतं नाव घेतलं तरी पोटात थंड पडतं. अशा या कोकमच्या साथी लिंबांचं सरबत, साखर घालून जर का मिश्रण बनवलं, तर रणरणीत उन्हातही घशाची कोरड कमी होते. अशा या ‘कूल कूल’ कोकमाचं हे गुपित..
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य
* लिंबाच्या ४ फोडी
* २ कोकम साले
* २० मिली साखरेचे सिरप
* ५० मिली कोकमाचा ज्यूस
* बर्फ आणि सोडा.
कृती
सर्वप्रथम शेकरमध्ये लिंबाच्या फोडींचा रस काढून घ्या. आता पिळलेल्या फोडीसुद्धा त्यात टाका. त्यातच कोकम टाका आणि थोडेसे खलून घ्या. आता यामध्ये साखरेचे सिरप टाका. कोकमाचा रस टाका. हे छान घुसळून घ्या. त्यावर बर्फ घाला आणि पुन्हा एकदा झक्कास शेक करून घ्या. आता छानशा ग्लासामध्ये हे मिश्रण ओता आणि वरून सोडा घाला.
First published on: 21-02-2018 at 04:26 IST
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kokum caprioska recipes