घराची सजावट करताना लिव्हिंग रूम डिझाइनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बैठक व्यवस्था केली जाते. बैठक व्यवस्थेशिवाय लिव्हिंग रूम पूर्ण होऊ शकत नाही. लिव्हिंग रूमच्या इतर कोणत्याही फर्निचरपेक्षा बैठक व्यवस्था सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. कारण लिव्हिंग रूममध्ये बसणे हाच सर्वात महत्त्वाचा भाग असतो. यामध्ये फॉर्मल सीटिंग, सेमी फॉर्मल सीटिंग, इनफॉर्मल सीटिंग, कॅज्युअल सीटिंग, युटिलिटी सीटिंग व थीम बेस्ड सीटिंगअसे काही प्रकार आहेत. फॉर्मल सीटिंग म्हणजेच सर्वत्र दिसणारा सोफा. पूर्णपणे अपहोलस्ट्रीने झाकलेला हा सोफा पाश्चिमात्य पद्धतीने तयार केला आहे. हा सोफा बनवताना सर्वप्रथम लाकडाची चौकट म्हणजेच सोफ्याचा सांगाडा बनवला जातो. त्यावर गरजेनुसार विशिष्ट जाडीचा फोम चढवला जातो व सगळ्यात शेवटी अपहोलस्ट्रीने सजवण्याचे काम केले जाते. अपहोलस्ट्रीमध्ये लेदर, रेग्झिन व कापड मुख्यत्वे वापरले जाते. या प्रत्येक प्रकारात खूप प्रकार उपलब्ध आहेत. आधी हा सोफा शोरूममध्ये तयार स्वरूपात मिळायचा, पण गेल्या काही वर्षांपासून आपल्या गरजेनुसार सोफा बनवून मिळतो. घरी सोफा बनवून घेण्याचा फायदा असा की, वापरल्या जाणाऱ्या मटेरियलच्या दर्जाची खात्री देता येते. कारखान्यातून बनवून आणलेला सोपा बादर्शनी दिसायला जरी सुंदर दिसत असला तरीही आत सुमार दर्जाचे मटेरियल वापरले जाण्याची शक्यता असते. या कारणास्तव खात्रीच्या शोरूममधूनच सोफा खरेदी करावा. काही शोरूम्स विशिष्ट कालावधीची हमीही देतात. या कालावधीत सोफ्यास काही झाल्यास तो विनामूल्य दुरुस्त करून दिला जातो. अर्थात सोफा खराब होण्यात ग्राहकाची चूक नसावी. शोरूममधून सोफा घेण्याचा आणखी एक फायदा म्हणजे सोफा बनवताना होणाऱ्या त्रासामुळे सुटका होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा