साहित्य- आल्याचे ४-५ काप, पुदिन्याची १०-१५ पाने, १ चमचा खडेमीठ, १ चमचा जिरे पूड, १ चमचा साखरेचा पाक, अर्धा चमचा लिंबूरस, बर्फ, पाणी.
कृती – आल्याचे काप आणि पुदिन्याची पाने एकत्र करा. ते नीट कुटून घ्या. त्यात खडे मीठ, साखरेचा पाक, लिंबू रस, जिरे पूड आणि पाणी घाला. आता हे मिश्रण छान ढवळा. शेकरमध्ये घुसळून घ्या. त्यावर बर्फ घाला आणि पुन्हा एकदा ढवळून घ्या. एक उंचसर पेला घ्या. त्यामध्ये हे मिश्रण ओता आणि लिंबाच्या चकतीने सजवा. तुमची आले-पुदिना शिकंजी तैय्यार!
आणखी वाचा