अद्वय सरदेसाई
साहित्य
* ६ काळी द्राक्षं
* ५ ब्लू बेरी
* १८० मिली अननसाचा रस
* ६० मिली मध
* ६० मिली लिंबाचा रस
* २-३ पुदिन्याची पानं
* बर्फ.
कृती
एका शेकरमध्ये द्राक्ष, ब्लू बेरी, अननसाचा रस, मध आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकत्र करून घ्या. त्यात बर्फ भरून पुन्हा एकदा नीट शेक करून घ्या. शेक केल्यानंतर मिश्रण गाळून घ्या. यानंतर एका ग्लासात ते ओतून वर बर्फ भरा आणि पुदिन्याच्या पानांनी ते सजवून पेश करा.