डॉ. सारिका सातव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

नाचणी पीठ – २ मोठे चमचे, तूप १ चमचा, तेल १ चमचा, जिरे-धने पावडर १ चमचा, चिरलेल्या भाज्या १ वाटी (गाजर, कोबी, कांदा, फ्लावर इ.), कोथिंबीर चिरून पाव वाटी, काळी मिरी पावडर २ चिमूट, मीठ चवीनुसार.

कृती

नाचणी पीठ तुपामध्ये कढईत मंद आचेवर भाजून घ्यावे व बाजूला काढून ठेवावे. तेल गरम करून सर्व चिरलेल्या भाज्या परतून घ्याव्यात.

धने-जिरे पावडर व किंचित मीठ घालून मऊ होईपर्यंत भाज्या परताव्यात. भाजलेले नाचणीचे पीठ गरम पाण्यात थोडे थोडे घालून घट्ट द्रावण तयार करावे. गुठळय़ा होऊ देऊ नयेत.

शिजलेल्या भाज्यांमध्ये थोडे पाणी आणि मिरपूड टाकून एक उकळी आणावी. नंतर हळूहळू घट्ट द्रावण यात मिसळावे. सतत चमच्याने हलवत राहावे. आवश्यकतेनुसार पाणी मिसळावे. शिजल्यानंतर कोथिंबीर टाकून सूप सजवावे.

वैशिष्टय़े

नाचणी हे लोह, कॅल्शिअम, प्रथिने यांचा उत्तम स्रोत आहे. चवीस उत्तम. पोट गच्च राहणे, मलबद्धता, भूक न लागणे इ.मध्येही अतिशय उपयुक्त. स्थूल व्यक्तींमध्ये जेवणाऐवजी घेतल्यास कमी ऊर्जा पण भरपूर जीवनसत्त्वे मिळतात. लहान मुले, गर्भवती स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या माता, रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया, वृद्ध इ.मध्ये विशेष उपयुक्त.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nachni soup recipe in marathi for loksatta readers