नकुल घाणेकर, नृत्य-प्रशिक्षक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक वेळा एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असतात. सकाळच्या कार्यक्रमात मी कलाकार म्हणून काम करत असेन तर सायंकाळी मी नृत्य-प्रशिक्षक म्हणून काम करत असतो. अशा वेळी ताण येणे स्वाभाविक असते. कधी कुटुंबीयांना वेळ देता येत नाही म्हणून ताण येतो तर कधी प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना ताण येतो. या ताणातून मुक्ती मिळावी यासाठी वाहन चालविण्यास मला अधिक आवडते. आपल्या आजूबाजूला पसरलेल्या निसर्गातून बरेच काही शिकण्यासारखे असते. कधी निसर्ग न्याहाळणे, तर कधी कुटुंबासह एक दिवसाची सहल करणे हे मला अत्यंत आवडते. ताण जाणवल्यास मी वाचनाचाही छंद जोपासत असतो. सोपे लिखाण असलेली पुस्तके वाचायला मला आवडतात. खूप जास्त ताण जाणवत असल्याचे वाटले की विविध भारतीवरील कार्यक्रम मी आवर्जून ऐकतो. या कार्यक्रमातून ज्ञान तर वाढतेच मात्र जुन्या गाण्यांचा आस्वाद घेता येतो. ताणमुक्तीसाठी मी व्यायामाचा पर्यायही निवडतो. याचे मूळ कारण म्हणजे आपण तंदुरुस्त राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. व्यायाम केल्यानंतर एक वेगळी ऊर्जा शरीरात तयार होते. ही ऊर्जा काम करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. ताण ही जीवनातील अनावश्यक गोष्ट आहे. त्यामुळे हा ताण घालविण्यासाठी आपणच प्रयत्न करणे आवश्यक आहे. घर, व्यवसाय आणि करिअर सांभाळताना हा ताण येथे अत्यंत स्वाभाविक असते. यासाठी कधी घरातील टीव्ही सुरू करतो आणि जो कार्यक्रम सुरू असेल तो पाहत असतो. यामुळे मला आनंद मिळतो. वेळ मिळाल्यावर कुटुंबीयांशी गप्पा मारणे या पर्यायाचाही मी वापर करतो. काम करण्यासाठी अगदी थोडय़ा ताणाची गरज असते. मात्र ताणाचे प्रमाण जास्त झाल्यास ते नक्कीच धोकादायक असू शकते. कोणतीही कला जोपासल्याने ताणापासून मुक्ती मिळते.