डॉ. सारिका सातव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

* बासमती तांदूळ- पाव कप

* दूध- एक लिटर

* पिस्ता- ८ ते १०

* साखर किंवा खडीसाखर- एक कप

* बदाम- १५ ते २०

* वेलची- ४ ते ५

* केशर- १० ते १५ तंतू

* तूप- १ चमचा

कृती

* तांदूळ दोन ते तीन वेळा धुऊन घ्यावा आणि सुक्या कापडावर पसरवून सुकवून घ्यावा.

* सुकल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा.

* दूध एका पातेल्यात गरम करण्यास ठेवावे.

* दूध गरम झाल्यानंतर एका छोटय़ा वाटीत थोडे दूध घेऊन केशर त्यात भिजवावे.

* बारीक केलेला तांदूळ तुपात भाजून उकळलेल्या दुधात मिसळावा.

* मंद आचेवर शिजू द्यावे. सतत दूध चमच्याने हलवत राहावे.

* साखर मिसळावी.

* गरम पाण्यात बदाम थोडा वेळ भिजवून साल काढून मग त्याचे काप करावेत.

* पिस्त्याचेही काप करून घ्यावे.

* वेलची बारीक करून घ्यावी.

* खीर होत आल्यानंतर बदाम, पिस्ता व वेलची पूड टाकून ५ ते ६ मिनिटे उकळू द्यावे.

* सर्वात शेवटी केशर असलेले दूध व आवश्यकतेनुसार गुलाबपाणी मिसळावे.

* गॅस बंद करून थंड होऊ द्यावे.

* थंड फिरनी देताना वरून परत बदाम काप टाकावे.

वैशिष्टय़े :

* लहान मुले, अतिकृश, गर्भवती, स्तनपान करणाऱ्या माता, तापानंतर अशक्तपणा असणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त

* चांगल्या प्रकारे प्रथिने मिळतात.