|| दीपा पाटील

साहित्य : मध्यम आकाराची कोळंबी १ कप, अर्धा चमचा हळद, ४ चमचे व्हिनेगर,  मीठ, २ चमचे तेल,

१ चमचा साखर.

मसाल्यासाठी – १० लाल सुक्या मिरच्या,

७-८ लसूण, २ इंच आल्याचे तुकडे,

१० काळीमिरी, ४ लवंगा, १ इंच दालचिनी,

१ चमचा जिरे, १ चमचा मोहरी.

कृती : कोळंबी साफ करून स्वच्छ धुऊन घ्या. तिला मीठ आणि हळद लावून ठेवा. मसाल्याचे सर्व साहित्य एकत्र वाटून घ्या. यामध्ये व्हिनेगर घालून पुन्हा ते वाटून घ्या. म्हणजे छान गुळगुळीत वाटण तयार होईल. एका भांडय़ात तेल गरम करून त्यात कोळंबी परतून घ्या. आता ही परतलेली कोळंबी बाजूला काढून घ्या. आता याच भांडय़ात मसाल्याचे वाटण घालून ते ५-१० मिनिटे परतून घ्या. त्यावर कोळंबी घाला. आता या मिश्रणात साखरही घाला. पुन्हा ५ मिनिटे परता. गॅस बंद करा. हे लोणचे काचेच्या स्वच्छ धुतलेल्या, पुसलेल्या कोरडय़ा बरणीत भरा. ते आठवडाभर चांगले राहते. फ्रीजमध्ये जास्त दिवसही ठेवता येईल.

Story img Loader