साहित्य – – नाचणीचे पीठ एक वाटी, रवा एक वाटी, तांदुळाचे पीठ पाव वाटी, पाणी, मीठ, किंचित हिंग.
कृती : तिन्ही पिठे व्यवस्थित एकत्र करून घ्यावीत. सरसरीत मिश्रण होईल इतपत पाणी घालावे. आता यात मीठ आणि किंचित हिंग घालून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर नेहमीप्रमाणे डोसे घालावेत. थोडे जाड घातल्यास घावणही होतील. रवा आणि तांदुळामुळे हा पदार्थ कुरकुरीत होतो. रंग लालसर असतो. चव मात्र छानच लागते. जोडीला चटणी, सॉस काहीही घेऊ शकता.
आणखी वाचा