फुलात दडलेल्या शुभेच्छा
रद्दीत जाणाऱ्या कागदांचा पुनर्वापर म्हटलं की सर्वानाच कागदी पिशव्या आठवतात. पण प्रत्यक्षात अन्यही काही प्रकारांनी आपण या कागदांचे व्यवस्थापन करू शकतो. आज आपण रद्दी कागद वापरून फुलाच्या आकाराचे शुभेच्छापत्र कसे बनवता येईल, ते पाहू..
साहित्य :
साहित्य – रद्दी कागद, जुनी पत्रिका किवा रंगीत (हँडमेड) कागद, कात्री, गम, स्केचपेन, पेन्सिल, यु क्लीप, सेलो टेप इत्यादी.
कृती
* रद्दी पेपर गुंडाळून काडीसारखा आकार द्या.
* जुनी पत्रिका किवा रंगीत (हँड्मेड) कागद चौकोनात कापा.
* चारपदरी घडी घाला व मोकळ्या बाजूला पाकळीचा आकार काढा.
* आकार बाहेरून कापून घ्या, उघडल्यावर फूल तयार होईल.
* दोन घडय़ा कोनाच्या बाजूने आत ओढा.
* आतमध्ये सगळ्या पाकळ्या लपतील व बाहेर बदामाचा आकार दिसेल.
* यू क्लिपवर आणखी एक छोटासा बदाम सेलो टेपने जोडा.
* ही यू क्लीप कोनात जोडून फूल बंद करा.
* इतर सुशोभनाचे साहित्य वापरता येईल
* ज्या व्यक्तीला शुभेच्छा द्यायच्या आहेत, तिचे नाव बाहेरील बाजूस लिहा, आतमध्ये तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे, तो लिहा.
* फुलाला काडीची गुंडाळी टेप किवा गमने जोड.
* या रक्षाबंधनाला आपल्या प्रियजनांना हे शुभेच्छा पत्र द्या.
apac64kala@gmail.com