साहित्य –  जाडा रवा १ वाटी, आंबट दही दोन चमचे, मीठ, साखर. हे अगदी बेसिक साहित्य झाले. यात तुम्ही तूप, जिरे, हिंग, कढीलिंबाची फोडणी करून त्यात काजूसुद्धा घालू शकता. त्याचप्रमाणे हळद, कोथिंबीर आवडीप्रमाणे वापरू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कृती –  रवा दही आणि गरजेप्रमाणे पाणी घालून घट्टसर भिजवून घ्यावा. रवा खूप काळ भिजवून ठेवू नये नाही तर त्याला पाणी सुटते. त्यात साखर, मीठ चवीप्रमाणे घालून घ्यावे. आवडत असेल तर तूप-जिरे-हिंगाची फोडणी करून त्यात कढीपत्ता आणि काजू घालून मग ती या रव्याच्या पिठावर ओतून घ्यावी. रव्यामध्ये आवडीप्रमाणे हळद, कोथिंबीरही वापरता येईल. इकडे तळणीसाठी तेल कडकडीत गरम करावे. तापलेल्या तेलात साधारण आकाराचे वडे लालसर तळून घ्यावेत. तळलेले नको असल्यास तव्यावर टिक्कीप्रमाणे भाजताही येतील. मात्र हा प्रकार गरमागरमच खावा.