परदेशी पक्वान्न – नीलेश लिमये

रोस्ट टर्की ख्रिसमस हा एक आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. आपल्याकडे टर्की सहजी मिळत नाही. त्याऐवजी चिकन वापरता येऊ शकेल.

साहित्य

  •  १ हिरवे सफरचंद (चकत्या करून घेतलेले)
  •  १ चमचा लिंबुरस
  •  ७-८ चकत्या फ्रेंच बगेत
  • ३/४ लाल कोबीची पाने
  •  शिजवलेले टर्की ब्रेस्ट
  •  किसलेले चीज, ४ चमचे डिजॉन मस्टर्ड.

कृती

प्रथम सफरचंदाच्या चकत्यांवर लिंबू पिळून घ्यावे. फ्रेंच बगेतचे ४ तुकडे करून घ्यावेत. फ्रेंच बगेतची एक चकती घेऊन त्यावर मस्टर्ड पेस्ट लावावी. त्यावर चीज पसरावे. त्यावर कोबीचे पान ठेवावे. शिजवलेल्या टर्की ब्रेस्टच्या चकत्यांनाही मस्टर्ड सॉस लावावा. हे टर्की कोबीच्या पानावर ठेवावे. अशा प्रकारे सँडविच तयार होईल. हे सँडविच तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. थंडगार झाल्यानंतर सॉससोबत खायला द्यावे.

nilesh@chefneel.com

Story img Loader