|| दीपा पाटील

साहित्य

  • मोठी कोलंबी २० ते २५, बेसन १ कप,
  • आलं-लसूण वाटण २ मोठे चमचे,
  • मसाला २ मोठे चमचे, लाल तिखट १
  • मोठा चमचा, जिरे पूड १ मोठा चमचा,
  • ओवा १ चमचा, लिंबूरस १ मोठा चमचा,
  • दही ४ मोठे चमचे, चाट मसाला १
  • मोठा चमचा, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी.

कृती

कोलंब्यांना लिंबूरस, आलं-लसूण वाटण, जिरे पूड, मसाला, लाल तिखट, दही व मीठ चांगले चोळून घ्या. नंतर त्याला ओवा, बेसन व तांदळाचे पीठ लावून ही कोलंबी तेलात तळून घ्या. वरून चाट मसाला भुरभुरा.