|| दीपा पाटील
साहित्य
आणखी वाचा
२ वाटी मुंडी (बकऱ्याची मुंडी), १ वाटी हरबरा डाळ, १ कांदा बारीक कापून, २ मोठे चमचे आलं-लसूण वाटण, २ मोठे चमचे आगरी-कोळी मसाला (नसल्यास तुमचा नेहमीचा मसाला), १ मोठा चमचा गरम मसाला, अर्धी वाटी ओलं व सुकं खोबरं वाटण करून, अर्धा चमचा हळद, अर्धा वाटी तेल, कोिथबीर, मीठ चवीनुसार.
कृती
सर्वप्रथम मुंडी बारीक कापून उकडवून घ्या. चणाडाळ दोन तास भिजवून उकडवून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करा, त्यात कांदा टाकून परतवा. नंतर त्यात आलं-लसूण वाटण टाका. त्यात डाळ व मुंडी टाका, सर्व मसाले, मीठ टाकून चांगले एकत्र करा आणि एक वाफ काढा. नंतर त्यात खोबऱ्याचे वाटण व कोिथबीर टाकून पुन्हा एक वाफ काढा. आवडीप्रमाणे थोडे पाणी टाका.
टीप
मुंडीत हरबरा डाळीऐवजी अख्खे चणेही घेऊ शकता.