रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com
प्राणीपालकत्व स्वीकारणे हे फक्त हौस वा छंद या वर्गातील असले तरी ही जबाबदारीची हौस आहे. वेळ, पैसा, ऊर्जा यांबाबत ही दीर्घकालीन बांधिलकी आहे.
घरातील लहान मुलांच्या हट्टापायी अनेकदा पेटसदस्याचे आगमन होते. कुटुंबात प्राणी असणे हे मुलांच्या जडणघडणीसाठी फायद्याचे असते. निरागस मैत्रीची गरज भागविण्याबरोबरच मुलांमधील जबाबदारीची जाणीव, दुसऱ्याला समजून घेण्याची सवय होते. प्राण्यांची काळजी घेताना त्यांच्यातील हळुवारपणा, समंजसपणा वाढू लागतो. मात्र हे सगळे असले तरी प्राणी पाळताना अनेक मुद्दय़ांचा सखोल विचार करूनच निर्णय घेणे आवश्यक आहे. जाहिरात, चित्रपटात आवडलेली श्वान प्रजाती, मित्राकडे आहे म्हणून, ओळखीत प्राणी मोफत मिळाला म्हणून प्राण्यांची निवड झाल्यास ते भविष्यात कुटुंबाला आणि प्राण्यांसाठीही अपायकारक ठरते.
प्राणी कोणता हवा?
कुत्री, मांजरे, मासे यांच्या अनेक देशी, परदेशी प्रजाती, परदेशी पक्षी यांबरोबरच हमस्टर्स, ससे, उंदीर अशा पर्यायांचाही अलीकडे विचार होतो. अतिहौशी कुटुंबामध्ये इग्वाना, मार्मोसेट माकडे, कासवे, परदेशी खारी पाळण्याचे प्रमाण वाढत आहे. आता यातील काय पाळणे सोपे या प्रश्नाला एका वाक्यात वा एका शब्दात उत्तर नाही. वेळ, पैसे यांचे गणित कमी अधिक प्रमाणात सर्वच प्राण्यांसाठी जुळवावे लागते. म्हणजे पेटीत चार मासे सोडले, पिंजऱ्यात पक्षी ठेवून खाणे घातले वा कुत्रे आणून त्याच्या गळ्यात पट्टा अडकवला, मांजरासाठी खाणे ठेवले की झाले, असे खचितच नाही. लहान मुलांची जडणघडण होते तशीच प्राणी कुटुंबात दाखल झाल्यावर ती त्यांचीही होत असते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्राण्यांच्याही भावनिक, आहार, उपचार याच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यांनाही कुटुंबात सामावून घ्यावे लागते. नव्या माणसांशी जुळवून घेताना जशा तडजोडी कराव्या लागतात. तशाच प्राण्यांसाठी वेळप्रसंगी त्या करणे हे कर्तव्य आहे. त्यामुळे प्राण्यांची निवड चुकल्यास हौसेने आणलेले नवे सदस्य त्रासदायक वाटू लागतात. मग त्यांच्याबरोबर पालकांचे वागणे तुटक होऊ लागते आणि हा प्रश्न अधिक वाढत जातो.
पालन का?
घरातील लहान मुलांना साथीदार, ज्येष्ठ नागरिकांना मदत, राखण करण्यासाठी यापैकी आपली गरज काय हे स्पष्ट हवे. त्यानंतर मुद्दा येतो क्षमतेचा. प्राण्यांची काळजी, जबाबदारी कोण घेणार याचा विचार हवा. प्राण्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करणे, त्यांना शिकवणे, त्यांच्याशी खेळणे, काळजी घेणे यासाठी कितपत वेळ देणे शक्य आहे याचे गणित निश्चित हवे. प्रत्येक प्राणी, प्रजाती यांचे स्वभाव, गुणवैशिष्टय़े वेगळी असतात. त्या अनुषंगाने कुटुंबाचे वातावरण (टेम्परामेंट) कसे आहे याचा विचार करून निवड करणे आवश्यक असते. घरातील व्यक्तींचे आजार, अॅलर्जी याचाही विचार हवा. प्राण्यावर, त्याच्या गरजा भागविण्यासाठी किती खर्च करू शकतो याचाही निर्णय व्हायला हवा.
समुपदेशकांची मदत
* या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी या क्षेत्रातील समुपदेशक, प्राणी प्रशिक्षक मदत करू शकतात. याशिवाय यासाठी अनेक संकेतस्थळेही आहेत. प्रजातींची माहिती, वैशिष्टय़े त्या माध्यमातून कळू शकतात. प्रश्नावलीच्या माध्यमातून कोणता प्राणी पाळावा याबाबत अचूक नाही तरी प्राथमिक कल्पना येऊ शकते.
* प्राणी पालन ही जबाबदारी असली तरी तो खूप काही शिकवणारा, आनंद देणारा काही वेळा आयुष्यात उद्देश मिळवून देणारा अनुभव असतो. कधी तरी प्राणीपालकत्वाचा प्रवास नक्कीच करावा.
* प्राणी पाळणे ही दीर्घकालीन जबाबदारी आहे याची जाणीव हवी
* प्राणी घरी आणल्यानंतर कालांतराने झेपत नाही म्हणून त्याला घराबाहेर हकलणे हा सामाजिक गुन्हा आहे
* कुटुंबाच्या गरजा, त्यातील अपेक्षित बदल, उपलब्ध जागा, खर्च करण्याची क्षमता, वेळ अशा सर्व मुद्दय़ांचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे
* प्रत्येक टप्प्यावर प्राण्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात
* प्राण्यांनाही कुटुंबात रुळवून घ्यावे लागते