दीपा पाटील

साहित्य

२ चिकन ब्रेस्ट, ४ लसूण पाकळ्या, २ इंच आले बारीक चिरून, २ अंडय़ांचा पिवळा बलक, १ चमचा कॉर्नफ्लॉवर, २ चमचे पिस्ते, १ चमचा मिरपूड, ४ चमचे तीळ, मीठ, तळण्याकरिता तेल.

कृती

तेल आणि तीळ सोडून बाकीचे सर्व साहित्य बारीक वाटून घ्यावे. चिकनचे तुकडेही मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटून घ्यावेत. आता हे एकत्र करून या सारणाचे लहान लहान गोळे करावेत आणि ते तिळात घोळवून फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवावे. नंतर तेलात लालसर तळून घ्यावेत. सॉससोबत खायला द्यावेत.

Story img Loader