मिलिंद रायकर, व्हायोलिन वादक

ताण हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असून एखाद्या गोष्टीतून जेव्हा तुम्ही समाधान मिळविण्याचा प्रयत्न करता, तेव्हा हा ताण आपोआपच हलका होतो. मुळातच संगीत हे ताण हलका करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. संगीताच्या माध्यमाचा अभ्यास करण्यासाठी साधना आवश्यक असून ही साधनाच ताणमुक्तीचा एक उत्तम पर्याय आहे.   मला ताण-तणाव भेडसावतात, तेव्हा मी गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि उस्ताद अमीर खान यांची गाणी ऐकतो. चांगल्या मित्रांना भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे त्यामुळे बराचसा ताण हलका होण्यास मदत होते. आचार्य अत्रे, पु.ल देशपांडे यांची पुस्तके वाचायला मला अधिक आवडतात. याशिवाय बऱ्याच वेळा आध्यात्मिक पुस्तकांचेही वाचन करतो. प्राणायाम करतो. व्यायाम करण्यामुळे आरोग्य उत्तम राहते आणि आरोग्य उत्तम असेल तर मनही उत्तम राहते.

pandit hridaynath mangeshkar open up about sister and singer lata mangeshkar
दीदी आपल्यातून गेलेली नाही… पं. हृदयनाथ मंगेशकर यांची भावना
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Haldi Ceremony Viral Video
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच
chhaava new song aaya re toofan release now marathi singer vaishali samant
मुघलांशी संघर्ष ते सिंहाचा जबडा फाडला…; ‘छावा’च्या नव्या गाण्याला मराठमोळ्या गायिकेचा आवाज; अंगावर येईल काटा, सर्वत्र होतंय कौतुक
chhaava director lakshman utekar reveals most emotional scene
विकीने १५ टेक घेतले, ढसाढसा रडला अन्…; ‘छावा’च्या दिग्दर्शकाने सांगितला सेटवरचा ‘तो’ प्रसंग, लक्ष्मण उतेकर म्हणाले…
Aunty dance Hawa Hawa Aye Hawa
“हवा हवा ऐ हवा, खुशबू लुटा दे…” गाण्यावर काकूंनी केला दिलखुलास डान्स, Viral Video पाहून तुम्ही व्हाल खुश, एकदा बघाच
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?

‘अनाम प्रेम’ या संस्थेशी मी निगडित आहे. ही संस्था अपंग, अंध, वयोवृद्ध नागरिकांना मदत करते. या संस्थेत काम केल्याने मला समाधान मिळते. जेव्हा एखादी धून मी सादर करतो, तेव्हा त्यातून रसिकांना मिळणारे समाधान आणि त्यांनी दिलेली शाबासकीही मला समाधान देते आणि माझा ताण हलका करते. त्यामुळे समाधान देणारी प्रत्येक गोष्ट माझा ताण हलका करत असते.

शब्दांकन – भाग्यश्री प्रधान

Story img Loader