अर्धा किलो बिया काढलेले कलिंगड, ६०मिली लिंबूरस, थोडीशी साखर, ५-१० पुदिन्याची पाने, बर्फ, दोन चमचे भरून आल्याचा रस, सोडा.
कृती
आणखी वाचा
कलिंगडाचे छान तुकडे करून घ्या. ब्लेंडरमध्ये साखर, लिंबूरस आणि कलिंगड घालून घुसळून घ्या. त्याचे छान गुळगुळीत मिश्रण तयार होईल. पुदिना आणि थोडी साखर छानपैकी खलून घ्या. हे मिश्रण ग्लासाच्या तळाशी टाका. त्यात अर्धा ग्लास भरेल इतके कलिंगडाचे वरील मिश्रण ओता. त्यावर बर्फ टाकून आल्याचा रस घाला आणि ढवळून घ्या. त्यावर सोडा ओता. तुमचे कलिंगड मोहितो तयार. सजावटीसाठी पुदिन्याची पाने लावा.