मला टाटा टिआगो, मारुती वॅगनार किंवा ह्युंदाई आय १० यापैकी एक कार घ्यायची आहे. माझे बजेट सहा लाखांपर्यंत आहे. महिन्याला रनिंग ३०० किमीपर्यंत अपेक्षित आहे. तर कोणती कार घेणे योग्य ठरेल, याबाबत मार्गदर्शन करा.     – रवी काळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • तुम्ही ह्य़ुंदाई ग्रॅण्ड आय१० किंवा मारुती इग्निस घ्यावी. तुमचा वापर कमी असल्यामुळे ती तुम्हाला योग्य राहील. वापर कमी असल्यामुळे या दोन कंपन्यांची देखभाल आणि रिझल्ट उत्तम आहे.

माझा मासिक प्रवास २ हजार किलोमीटर आहे. यातील निम्मा प्रवास ग्रामीण भागामध्ये आहे. माझे बजेट ५ लाखांपर्यंत आहे. मी स्विफ्ट किंवा स्विफ्ट डिझायर घेण्याच्या विचारात आहे. माझ्यासाठी कोणता पर्याय योग्य राहील. कृपया मार्गदर्शन करा.   – अदि गिरी

  • जर तुम्ही सेकंड हॅण्ड गाडी घेण्याचा विचार करत असाल तर डिझेल पोलो घ्यावी. तुमचा प्रवास ग्रामीण भागामध्येही असल्यामुळे तुम्ही नवीन केयूव्ही १०० डिझेल घ्यावी, असा माझा सल्ला आहे. या गाडीला ग्राउंड क्लिअरन्स उत्तम आहे. खडबडीत आणि दगडधोंडय़ाच्या रस्त्यात ही गाडी चालवताना अतिशय दमदार वाटते.

नमस्कार, मला चार चाकी नवीन गाडी घ्यायची आहे. तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी मेंटेनन्स, सव्‍‌र्हिसिंग आणि या सगळ्यांचा विचार करून कोणती कार घेऊ. फोक्सवॅगन, पोलो फियाट, पुन्टो इवो आणि फोर्ड फिगो यापैकी कोणती कार घ्यावी. कृपया योग्य पर्याय सुचवा.       – हेमंत कुरणे

  • होय, मेंटेनन्सला कमी खर्च, दमदार आणि आरामदायी गाडी जर बघत असाल तर नक्कीच फोर्ड फिगो घ्यावी. तिचे मायलेजदेखील उत्तम आहे. पेट्रोलमध्ये दुसरा उत्तम पर्याय म्हणून तुम्ही मारुती स्विफ्टचा पर्याय स्वीकारू शकता.
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which car is best for me