• कृपया मला कुटुंबासाठी १५० ते २०० सीसीपर्यंतची दुचाकी घेण्याची इच्छा आहे. माझ्याकडे यापूर्वी युनिकॉर्न १५० होती. तिचा अतिशय उत्तम अनुभव आहे. होंडा युनिकॉर्न १६०, सीबीझेड १५० किंवा यमाहाची कोणती दुचाकी माझ्यासाठी योग्य ठरेल. – मंदार देशपांडे

तुम्ही सुझुकी जिक्सर घेऊ शकता. ती अतिशय उत्तम बाइक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • मला ५ आसनी नवीन कार घ्यायची आहे. माझे बजेट ७ लाख रुपये आहे. टाटा नेक्सॉन गाडी कशी आहे. कृपया या बजेटमध्ये उत्तम असणारी गाडी सुचवा. – अक्षय वाघमारे

जर तुम्ही गाडीचा वापर जास्त करणार असाल तरच टाटा नेक्सॉन घ्या. अन्यथा होंडा किंवा मारुती पेट्रोल गाडीचा पर्याय निवडा. तुम्ही मारुती बलेनो किंवा होंडा जॅझ या पर्यायांचा विचार करू शकता.

  • माझ्याकडे सध्या २०१२ चे बोलेरो एस एल एक्स हे मॉडेल असून ते मला विकायचे आहे. तरी ते किती किमतीमध्ये विकणे अपेक्षित आहे. त्यातून राहिलेल्या शिल्लक पैशांमधून मला सेकंड हँड गाडी आरामदायी एसयूव्ही घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करा. – कार्तिक बेलूरकर

तुम्हाला त्या गाडीचे ३ लाख रुपये मिळू शकतील. आणि तुम्ही सेकंड हँड फोर्ड इकोस्पोर्ट डिझेल घेऊ शकता. ती तुम्हाला ५ ते ६ लाखांमध्ये उपलब्ध होऊ शकेल.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which car is best for me part