मासा पाण्यामध्ये तरंगताना जसा दिसतो, त्याप्रमाणे हे आसन करताना आपले शरीर दिसते. म्हणून या आसनाला मत्स्यासन असे म्हणतात. हे आसन नियमित केल्याने मान आणि खांद्यामध्ये जमलेला तणाव दूर होतो. या आसनात दीर्घ श्वास घेत राहिल्याने श्वसनाचे आजार कमी होण्यास मदत होते.

कसे करावे?

* दोन्ही तळहात पाश्र्वभागाच्या बाजूस जमिनीवर ठेवावेत. नंतर एकेक करून दोन्ही हातांची कोपरे जमिनीवर ठेवावीत.

* हळूहळू पाठ व डोक्याचा मागचा भाग जमिनीवर टेकवावा.

* आता दोन्ही तळहात मांडीखाली घालावेत आणि मांडय़ांचा आधार घेऊन कोपरे जमिनीवरच ठेवून त्यांच्या आधाराने कंबरेपासून डोक्यापर्यंतचा भाग वर उचलावा आणि डोक्याचा मागचा भाग कंबरेच्या बाजूस, पाठीस कमान करून जेवढे आत आणता येईल तितके आत आणावे आणि जमिनीवर ठेवावे.

* आता तळहात वर घेऊन डाव्या तर्जनीने उजव्या पायाचा अंगठा आणि उजव्या तर्जनीने डाव्या पायाचा अंगठा पकडावा. कोपरे जमिनीवरच राहू द्यावीत. हीच मत्स्यासनाची अंतिम स्थिती होय. यामध्येच डोळे मिटून घ्यावेत व सर्व लक्ष श्वासावर ठेवावे.

Story img Loader