आपण आरशात बघतो तेव्हा आपलं प्रतििबब आपल्याला आवडतं का? आपण जसे आहोत तसे आपण स्वत:ला स्वीकारतो का? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर होकारार्थी असणं हे सकारात्मक व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

’ आयुष्यभर आपण स्वत:ला बदलण्याचा, स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या भोवतालच्या व्यक्तींपैकी काहीजण आपल्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतात, काही तुलना करण्यात व्यग्र असतात तर काही खिल्ली उडवण्यात मश्गुल असतात. स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्याची इच्छा बाळगणं केव्हाही चांगलंच, पण या इच्छेमागे सकारात्मक दृष्टिकोन हवा आणि जो बदल घडवून आणायचा आहे, तो आपल्या स्वभावधर्माला मानवणारा हवा. आपल्याला स्वत:बद्दलच तिरस्कार वाटतोय, म्हणून बदल हवाय, अशी भावना यामागे असता कामा नये. स्वत:ची इतरांशी तुलना करण्याची चूक करू नका. त्यांच्या गुणांची कदर करायलाच हवी. मात्र, त्यांच्यासारखं बनण्याची इच्छा धरू नका किंवा स्वत:ला कमी लेखू नका.
’ आपली बलस्थानं ओळखा आणि त्यांचा अधिक वापर करा. आपोआपच त्यामध्ये अधिक सुधारणा होते. त्यामुळे आपल्या उणिवाही दुर्लक्षिल्या जातात. अर्थात करिअरसाठी आवश्यकता असल्यास सरावाने उणिवांवरही मात करता येते.
’ आत्मपरीक्षण करा. श्रीमंत, गरीब, उंच-बुटके, संवेदनशील, आक्रमक, रागीट.. जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारा. स्वत:वर प्रेम करा. आपण स्वत:वर प्रेम केलं तरच इतरांचं प्रेम मिळण्याच्या लायकीचे आपण होऊ. यामुळे सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास वाढीला लागेल.
’ कोणीही वाईट नसतं. उदाहरणार्थ, शिक्षकाच्या ठायी चिकाटी, दयाळूपणा, बुद्धिमत्ता आणि ज्ञान देण्याची वृत्ती असायला हवी. एखादा मुष्टियोद्धा रागीट, सामथ्र्यशाली आणि आक्रमक वृत्तीचा असायला हवा. तो जर मृदू, गरीब, शामळू असेल तर तो बॉक्सर कसा होऊ शकेल? जेव्हा आपण स्वत:ला ओळखतो आणि जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारतो, तेव्हा आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करण्याची क्षमता आपल्यात येते.
’ जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारलं तरच स्वत:मध्ये सुधारणा घडवणे शक्य बनते. पण या सुधारणा किंवा बदल हे आपल्या उणिवांवर नव्हे तर आपल्या बलस्थानांवर आधारित हवेत.
’ निसर्गाने आपल्याला जसं घडवलंय, तसंच स्वत:ला स्वीकारा आणि स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणा. एक व्यक्ती म्हणून आणि एक व्यावसायिक म्हणून आपण स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकू. निसर्गाने जसं बनवलंय, त्याच्या उलट दिशेला आपण जाणार नाही, याची
खबरदारी घ्या.