kalaसंगणकाचे मूलभूत प्रशिक्षण नोकरी तसेच स्वयंरोजगारासाठी पूरक ठरते. इंडो-जर्मन टूल रूम या संस्थेने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संगणकीय नेटवर्किंग या विषयीचे अल्पावधीचे कौशल्यनिर्मिती प्रशिक्षणक्रम सुरू केले आहेत. ही संस्था केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* सर्टििफकेट कोर्स इन अॅडव्हान्स्ड नेटवìकग- या अभ्यासक्रमात विविध सॉफ्टवेअर कशी हाताळावीत याची माहिती दिली जाते. यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, नोट पॅड या सॉफ्टवेअरचा समावेश आहे. शिवाय िवडो एक्सपीचे व्यवस्थापन आणि देखभाल, संगणक बसवणे, संगणकीय भागांची जोडणी, हाताळणी, सव्र्हर नेटवर्क आणि नेटवìकगसंबंधित वेगवेगळ्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
* सर्टििफकेट कोर्स इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेन्टनन्स अॅण्ड नेटवìकग- या अभ्यासक्रमात नेटवìकग आणि ऑपरेटिंग कार्यप्रणालीची मूलभूत ओळख, संगणकाची मेमरी, स्टोअरेज, संगणक हाताळताना निर्माण होणाऱ्या विविध समस्या आणि त्याचे निराकरण, संगणकाच्या भागांची जोडणी आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. या दोन्ही प्रशिक्षणांना दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.

प्रशिक्षणाचा कालावधी- प्रत्येकी ३ महिने.
पत्ता- इंडो जर्मन टूल रूम, पी- ३१,
एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया,
चिखलठाणा, औरंगाबाद- ४३१००६
ईमेल- gm@igtr.aur.org
वेबसाइट- http://www.igtr-aur.org

Story img Loader