मिटकॉन सेंटर फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अॅण्ड स्किल डेव्हलपमेंट या संस्थेने ‘सर्टििफकेट कोर्स इन कॅटिरग’ सुरू केला आहे. ही संस्था सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाशी निगडित कौशल्य निर्मिती कार्यक्रमाला सहकार्य करणारी संस्था आहे.
वाढता कॅटिरग व्यवसाय आणि त्यासाठी आवश्यक भासणारे प्रशिक्षित मनुष्यबळ या बाबी लक्षात घेऊन या प्रशिक्षणक्रमात विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विविध प्रकारचे सूप, चाट मसाला, स्नॅक्स, सामीष अन्नपदार्थ, पंजाबी अन्नपदार्थ बनवायला शिकवतात. त्याचबरोबर विविध अन्नपदार्थातील आवश्यक पोषणमूल्ये, विविध खाद्यपदार्थ निर्मिती, कॅटिरग व्यवस्थापन, मेन्यू नियोजन आणि डेकोरेशन, परवाने आणि नियम, कर्ज आणि सवलती, विपणन, वेळ आणि मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबींची माहिती देतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणक्रमाला प्रवेश घेता येतो. प्रशिक्षणाचा कालावधी- दीड महिने.
हे प्रशिक्षण घेतल्यावर संबंधित उमेदवार कँटिन, फास्ट फूड जॉइंट्स, स्नॅक्स सेंटर आदी व्यवसाय सुरू करू शकतात तसेच विविध लहान-मोठय़ा समारंभामध्ये कॅटिरग सेवा पुरवू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा