गेल्या काही वर्षांत व्यापारी आणि नागरी सागरी वाहतूक मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. ही वाहतूक प्रवासी जहाजाद्वारे केली जाते. त्याद्वारे शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. या क्षेत्रात जहाजाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असते. अशा मोठाल्या जहाजांचा प्रवास महिनोन्महिने अहोरात्र सुरू असतो.
या प्रवासादरम्यान जहाजावरील कर्मचाऱ्यांची तसेच प्रवाशांच्या खानपानाची चोख व्यवस्था करण्यात येते. अशा जहाजांवर स्वतंत्र आणि अद्ययावत असा कॅटिरग विभाग असतो. या विभागात काम करण्यासाठीही प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. कॅटिरग विषयात प्रशिक्षणक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना ही संधी मिळू शकते. जहाजावरचे जीवन हे जमिनीवरील जीवनापेक्षा वेगळे असल्याने कॅटिरगच्या गरजाही वेगळ्या असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘ट्रेनिंग शिप रहमान’ या मरिन ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटतर्फे ‘सर्टििफकेट कोर्स इन मेरिटाइम कॅटिरग’ हा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला हा अभ्यासक्रम करता येईल. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांला दहावीत आणि बारावीत इंग्रजी विषयात किमान ४० टक्के गुण मिळणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा महिने. या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची निवड चाळणी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाते. यात उत्तीर्ण झाल्यानंतरच अंतिम निवड केली जाते.
संपर्क- ट्रेनिंग शिप रहमान, पोस्ट ऑफिस नाव्हा, ता.- पनवेल, जि.- रायगड- ५१०२०६.
वेबसाइट- http://www.tsrahaman.org
ईमेल – booking.cmch@tsrahman.org