शैक्षणिक अभ्यासक्रम निवडण्यापूर्वी, जर स्वत:चे व्यक्तिमत्त्व पारखता आले तर योग्य शिक्षणक्रम निवडणे सोपे होते आणि निवडलेल्या करिअर क्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्गही सुकर होतो. व्यक्तिमत्त्वानुसार, त्याला अनुकूल ठरणाऱ्या करिअर क्षेत्रांचा घेतलेला धांडोळा-

अंतर्मुख, संवेदनाशील, मनस्वी व्यक्तिमत्त्व
आदर्शवादी विचारसरणी आणि सच्च्या शांत मनोवृत्तीच्या या व्यक्ती कामाच्या ठिकाणी झोकून देऊन काम करतात. त्या उत्तम श्रोता असतात. दुसऱ्याच्या मनातील विचारांची गुंतागुंत त्यांना समजू शकते. या व्यक्ती स्वत:ची आणि इतरांची कार्यक्षमता ओळखतात. संपर्कातील व्यक्तींच्या भावना ओळखणे, त्यांना प्रेरित करणे, भावनिक आधार देणे, या व्यक्तींना जमते. असे असले तरी या व्यक्ती वृत्तीने संयमित, स्वत:चे मन पटकन उघड न करणाऱ्या असतात. अपेक्षेपेक्षा विरुद्ध परिस्थिती उभी राहिल्यास निराश होतात, मात्र कोणत्याही प्रसंगी या व्यक्ती चिकाटी सोडत नाहीत आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहतात. मनस्वी स्वभावाच्या या व्यक्ती सच्चेपणाला फार महत्त्व देतात. या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती आरोग्य सेवा क्षेत्रात, वैद्यकीय समुपदेशन, ऑक्युपेशनल थेरपी, न्यूट्रिशनिस्ट, सामाजिक कार्य, विकलांगांचे शिक्षण, भाषाविषयक सेवा उदा. अनुवाद, लेखन, संपादन या क्षेत्रांत उत्तम कामगिरी बजावू शकतात.

bjp leader vinod tawde reply to sharad pawar for targeting amit shah
अमित शहा देशभक्तीच्या प्रकरणात तडीपार; विनोद तावडे यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?

उत्साही, समंजस, कल्पक व्यक्तिमत्त्व
स्वयंऊर्जेने भारीत संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या या व्यक्ती, नवनव्या कल्पनांवर लक्ष केंद्रित करतात. सहकाऱ्यांना समजून घेत त्यांच्यातही कामाचा उत्साह जागृत करून त्यांनाही क्रियाशील बनवतात. अशा व्यक्ती नवकल्पना अधिक उत्तम प्रकारे समजून घेतात आणि समजावून सांगू शकतात आणि सहकाऱ्यांसोबतच्या अनुभवातून त्या बरेच काही शिकतात. स्वत:चे आणि इतरांचे व्यक्तिस्वातंत्र्य जपतात, नावीन्याचा शोध घेतात आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. स्वभावरचनेचा विचार करता या व्यक्तींचा कल स्वयंरोजगाराकडे अधिक असतो. या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तींना संगीत, गीतलेखन, कलादिग्दर्शन, अभिनय, डिझायनर, संगीत शिक्षण ही क्षेत्रे भावतात. केशरचना, प्राणी शिक्षण, छायाचित्रण, पत्रकारिता, वाणीदोष सल्लागार, सौंदर्यतज्ज्ञ अशा विविध कार्यक्षेत्रांत या व्यक्ती उत्तम कामगिरी बजावू शकतात.

जबाबदार, विश्वासार्ह, विनयशील
अशा व्यक्ती, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना सर्वतोपरी मदत करतात. त्या कामाप्रती एकनिष्ठ आणि विश्वासार्ह असतात. चिकाटी, नियोजन आणि अथक मेहनत यांच्या जोरावर या व्यक्ती यशस्वी होतात. साधारणत: या व्यक्ती कोणत्याही समूहाशी जुळवून घेतात, कारण अपेक्षित कार्य पूर्ण करून दाखवणे हे त्यांचे ध्येय असते. नोकरी किंवा कामातील धरसोड वृत्ती या व्यक्तींना मान्य नसते. स्वत:ची माहिती त्या इतरांपासून राखून ठेवतात. सामान्यत: या व्यक्ती परोपकारी असल्या तरीही प्रसिद्धीपराङ्मुख असतात. शाळा शिक्षक, ऑफिस असिस्टन्ट, अकाऊंटंट, समाजसेवक, आरोग्यसेवा शुश्रूषा, परिचारिका या कार्यक्षेत्रात त्या काम करू शकतात.

बहुविध बुद्धिमत्ता
जसे व्यक्तिगत मानसिकतेला विविध पलू असतात, त्याचप्रमाणे व्यक्तिगत बौद्धिक क्षमता ही विविध प्रकारे गणली जाऊ शकते. यालाच ‘मल्टिपल इंटेलिजन्स’ अथवा बहुविध बुद्धिमत्ता असे म्हणतात. यानुसारही करिअर क्षेत्र किंवा शिक्षण क्षेत्र निवडण्यास मदत होऊ शकते. त्याचे ढोबळमानाने विभाजन खालीलप्रमाणे करता येईल-
भाषाविषयक बुद्धिमत्ता- भाषा विषयांची विशेष आवड, मनातील विचार कमीत कमी शब्दांत समर्पकपणे, लीलया मांडण्याची हातोटी, वाचनाची तसेच लिहिण्याची मनस्वी आवड, भाषेचे प्रभावी आकलन यांतून व्यक्तीची भाषाविषयक बुद्धिमत्ता व्यक्त होते. या प्रकारचे कौशल्य विकसित करून लेखन, अनुवादन, पत्रकारिता, संहिता लेखन, परदेशी भाषा शिक्षक, प्रसार माध्यमे, कायदेतज्ज्ञ या क्षेत्रांत प्रगती साधता येते.

शारीरिक बुद्धिमत्ता- स्वत:च्या किंवा इतरांच्या शरीरात होणारे बदल अचूक ओळखता येणे किंवा शरीराचे अवयव लवचीकपणे वापरता किंवा वळवता येणे आणि एखादी विशिष्ट कृती करण्यासाठी शरीराच्या कोणत्या भागाचा प्रभावी वापर कसा आणि किती करावा लागेल यांचे उपजत ज्ञान म्हणजे शारीरिक बुद्धिमत्ता. अशा व्यक्तींना नर्तक, नृत्यशिक्षक शल्यविशारद, मूíतकार, सुतार, कॉम्प्युटर गेम्स डिझायनर, ज्वेलरी डिझायनर, अभिनेता किंवा स्टंटमन अशी कारकीर्द निवडता येईल.

सांगीतिक बुद्धिमत्ता- संगीत ऐकण्याची रुची, एखादे गाणे ऐकल्यानंतर, तसेच्या तसे त्याच पट्टीत गाता येणे किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या गाण्यातील चुकीच्या गोष्टी जाणवणे, एखाद्या गद्य साहित्याचे गेयतापूर्ण पद्य साहित्यात रूपांतर करता येणे म्हणजे सांगीतिक किंवा म्युझिकल इंटेलिजन्स. या व्यक्तींचा आवाज कदाचित पाश्र्वगायनाला अनुकूल असेलच असे नाही, पण त्यांना उत्तम स्वरज्ञान असते. या प्रकारचे उपजत ज्ञान विकसित करून संगीतकार, जाहिरातीसाठीची जिंगल्स, संगीत अध्यापन, कवितावाचन, ध्वनि अभियांत्रिकी, वाद्यांची दुरुस्ती, रेकॉíडस्ट, ध्वनिक्षेपक यंत्रणा अशा क्षेत्रांत प्रगती शक्य आहे.

दाíशक बुद्धिमत्ता- एखादी वस्तू किंवा घटना समोर नसतानाही तिचे स्वत:च्या बुद्धीने कल्पनाचित्र रंगवता येणे किंवा मनातले एखादे कल्पना चित्र जसेच्या तसे प्रत्यक्ष तयार करता येणे किंवा एखादे चित्र, नकाशा पाहिल्यानंतर त्याचे बुद्धीला तत्काळ आकलन होणे याला व्हिज्युअल इंटेलिजन्स असे म्हणता येईल. ही बुद्धिमत्ता वेळीच ओळखून अशा व्यक्तींना मूíतकला, डिझायनिंग, वास्तुशास्त्र, ग्राफिक डिझायनिंग, अ‍ॅनिमेशन, मेकॅनिकल कामे अशा क्षेत्रांत वाव मिळू शकतो.
संवेदनशील सामाजिक बुद्धिमत्ता- समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचता येणे, त्याने न सांगताही त्याच्या मनातली खळबळ ओळखता येणे याला संवेदनशील बुद्धिमत्ता म्हणता येईल. या व्यक्ती समोरच्याचे मन वाचू शकतात आणि अर्थातच त्याला अनुसरून प्रतिक्रियाही देऊ शकतात. अशा तरल मनाच्या व्यक्ती समाजसेवक, बौद्धिकदृष्टय़ा विकलांग मुलांचे शिक्षक, विपणन अधिकारी बनू शकतात.
ताíकक बुद्धिमत्ता- तार्किक बुद्धिमत्ता, मनातल्या मनात आकडेमोड करण्याचे बौद्धिक चापल्य, एखाद्या घटनेमागील तर्क सुसंगत कारणमीमांसा शोधता येणे, अवगत असलेल्या व्यक्ती गणित, विज्ञान, वैद्यकशास्त्र अशा कार्यक्षेत्र संबंधित करिअर निवडू शकतात. आपल्या बौद्धिकक्षमतेचा प्रकार आणि स्वभावरचना ओळखून, योग्य करिअर क्षेत्राची निवड करणे सुकर होऊ शकेल.

व्यवहारी, कार्यक्षम, मेहनती व्यक्तिमत्त्व
अशा व्यक्ती काटेकोर मेहनतीच्या आणि निष्ठेच्या जोरावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. हातात घेतलेले काम योजनाबद्ध पद्धतीने पूर्ण करू शकतात. समूहासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याचे काम या व्यक्ती उत्तमरीत्या निभावू शकतात. या व्यक्तींनी आखलेले उपक्रम वास्तवदर्शी आणि व्यवहार्य असतात. पुरावे, पूर्वानुभव, विश्वासार्हता या गोष्टी त्यांच्याकरता महत्त्वाच्या असतात. ‘उत्तम परिणामांसाठी योग्य ध्येय निश्चिती’ हा या व्यक्तींच्या स्वभावाचा पलू म्हणता येईल. या स्वभावरचनेच्या व्यक्ती व्यवस्थापन सल्लागार, हॉटेल व्यावसायिक, मालमत्ता व्यवस्थापक, शाळा पर्यवेक्षक, उत्पादक कंपनीत पर्यवेक्षक, देशाची सरंक्षण व्यवस्थेतील मुत्सद्दी अशा विविध क्षेत्रांत आपले भविष्य घडवू शकतात. संगणकतज्ज्ञ, अभियांत्रिकी कार्यक्षेत्र, व्यवस्थापन सल्लागार, अर्थ विश्लेषक, तांत्रिक लेखन, मल्टी मीडिया, अकाऊंट्स, वकिली या क्षेत्रांतही त्यांना प्रगती साधता येईल.

कृतिशील, प्रेमळ आणि आनंदी व्यक्तिमत्त्व
या व्यक्ती अत्यंत उत्साही आणि ऊर्जेने प्रेरित असतात. अशा व्यक्तींची आकलनशक्ती उच्च दर्जाची असते. कामाच्या ठिकाणची समस्या त्यांना तात्काळ समजते आणि त्यावर नावीन्यपूर्ण उपाय योजण्याची क्षमताही त्यांच्यात असते. मात्र, दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यापेक्षा युद्धजन्य परिस्थितीत, या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती कमालीच्या परिणामकारक ठरतात. धाडसाचे त्यांना आकर्षण असते. परिणामांची क्षिती न बाळगता, झोकून देणे, धडाकेबाज निर्णय घेणे या व्यक्तींना जमते, आनंदी राहणे आणि इतरांना आनंदी ठेवणे त्यांना सहज शक्य असते. विमा एजंट, विक्री अधिकारी, अभियांत्रिकी, दलाली व्यवसाय, शिक्षक, पत्रकारिता, कंत्राटदार, तंत्रज्ञ अशा कार्यक्षेत्रांत त्यांना प्रगती साधणे शक्य असते.

तात्त्विक, तार्किक आणि अलिप्त व्यक्तिमत्त्व
या व्यक्ती तटस्थपणे घडणाऱ्या परिस्थितीचे निरीक्षण आणि विश्लेषण करू शकतात. स्वत:च्याच कोशात अंतर्मुख होत प्रश्नांची उकल करतात. सर्वसामान्यांपेक्षा वेगळा आणि नावीन्यपूर्ण रीतीने विचार करणे या व्यक्तींना जमते. अताíकक दृष्टिकोन बाळगणारे सहकारी, कनिष्ठ किंवा वरिष्ठ यांचे सान्निध्य त्यांना तितकेसे पटत नाही आणि रुचतही नाही. या व्यक्ती बाह्य़ सौंदर्याने किंवा दिखाव्याने आकर्षतिही होत नाहीत. कोणाच्याही कामातील, विचारातील, बोलण्यातील सच्चेपण या व्यक्तींच्या मनाला भावते. कामाच्या ठिकाणी न पटणाऱ्या गोष्टी, विचार यांना स्पष्टपणे विरोध करण्यास या व्यक्ती कचरत नाहीत. यांचे वक्तव्य नेमके आणि मोजके असते.या प्रकारच्या व्यक्ती माहिती तंत्रज्ञान कार्यक्षेत्र, वेब डेव्हलपिंग, संगणकतज्ज्ञ, अभियांत्रिकी कार्यक्षेत्र, व्यवस्थापन सल्लामसलत, अर्थ विश्लेषण, तांत्रिक लेखन, मल्टी मीडिया आर्ट, अकाऊंटन्सी, वकिली या क्षेत्रांत प्रगती साधू शकतात.

(उत्तरार्ध) गीता सोनी

Story img Loader