कार्यालयीन कामकाज सुरळीत व्हावे आणि तेथील वातावरण निकोप राहावे यासाठी कामाच्या ठिकाणी काही औपचारिक-अनौपचारिक नियमांचे आणि वर्तणूक संकेतांचे कसोशीने पालन करणे आवश्यक ठरते. या नतिक मूल्यांमध्ये काही वैचारिक मूल्ये असतात- उदा. प्रामाणिकपणा, निष्ठा, बांधीलकी, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती वगरे तर काही वर्तणुकीचे संकेत असतात- उदा. मेहनत, वक्तशीरपणा, वरिष्ठांप्रति आदर इत्यादी. त्याविषयी..

वैचारिक आणि भावनिक नीतिमूल्ये
* प्रामाणिक वृत्ती – कार्यालयीन कामकाजासंदर्भात कामाशी आणि हेतूंशी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक राहणे अपेक्षित असते.
* बांधीलकी – दिलेले काम वेळेत आणि योग्य स्वरूपात पूर्ण केल्याने आणि वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांना दिलेला शब्द वेळ पाळल्याने (कमिटमेंट) कर्मचाऱ्याची प्रतिमा विश्वासार्ह बनते. यांत कार्यप्रक्रियेतील वायफळ खर्च टाळणे, संस्थेच्या किंवा कंपनीच्या हिताचा विचार करून कामासंदर्भात निर्णय घेणे या मुद्दय़ांचाही समावेश होतो.
* निष्ठा – काम करत असलेल्या संस्था किंवा आस्थापनेबाबत, कर्मचाऱ्याने आदर, निष्ठा बाळगल्याने आणि वेळोवेळी ती आचरणात आणल्याने, भ्रष्टाचार, लाच, अंतर्गत गटबाजी या प्रकारांना आळा बसतो. तसेच नोकरीतील धरसोड वृत्ती कमी होऊन कामगार गळतीसारखे प्रश्न उद्भवणे कमी होते.
* आदर – कामाच्या ठिकाणी इतरांबाबतचा आदर आपल्या वर्तनातून दुसऱ्याला जाणवून द्यायला हवा. यामुळे कामकाज सुरळीत चालण्यास मदत होते. कोणाही सहकाऱ्याच्या किंवा वरिष्ठ व्यक्तीच्या अपरोक्ष त्याची िनदा कटाक्षाने टाळावी.
* झोकून देऊन काम करण्याची वृत्ती – स्वीकारलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी, कर्मचाऱ्याने मनापासून प्रयत्न करायला हवेत.

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Cases of violation of Model Code of Conduct in Pune during poll campaign
आचारसंहिता भंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल; सिंहगड रस्ता पोलिसांकडून कारवाई

नीतिमूल्यांची घडण
कार्यालयीन वर्तणुकीचे संकेत हे अनेक कार्यालयांमध्ये अलिखित स्वरूपात असले तरी कर्मचाऱ्यांनी त्यांचे पालन करणे अपेक्षित असते. व्यक्तीतील नीतिमूल्यांची आणि तत्त्वांची घडण पुढील गोष्टींवर अवलंबून असते-
* शिक्षण आणि भावनिक बुद्धय़ांक
* कौटुंबिक आणि भोवतालचे वातावरण
* मित्रमंडळी, सामाजिक स्थिती
* व्यक्तिगत अनुभव

नीतिमूल्यांचे पालन आणि कार्यालयीन वातावरण..
नीतिमूल्यांचे पालन आणि कार्यालयीन वातावरण या दोन्ही बाबी परस्परावलंबी असतात. वर्तणुकीचे संकेतांचे पालन केल्याने पुढील गोष्टी घडतात-
* कर्मचाऱ्याकडून, कंपनीच्या किंवा संस्थेच्या तसेच सहकाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात.
* भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा, कामचुकारपणा या वर्तनाला आळा बसतो.
* गटबाजी आणि अंतर्गत राजकारण यांचा अटकाव शक्य होतो.
* स्पर्धक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची आणि कंपनीची प्रतिमा उंचावते.
* कर्मचाऱ्यांचे परस्परांशी आणि व्यवस्थापनाशी विश्वासाचे, सौहार्दाचे नाते तयार होते.
* कार्यालयात सांघिक शक्ती वाढीस लागते. परिणामी, गंभीर प्रश्नांची यशस्वी उकल शक्य होते.
* कार्यालयीन निकोप वातावरणामुळे, कर्मचाऱ्यांची मन:स्थिती समाधानी राहण्यास मदत होते.
* कंपनीच्या आíथक तसेच व्यावसायिक धोरणांबाबत गुप्तता पाळणे शक्य होते.

व्यक्तिमत्त्वातील नीतिमूल्यांची बठक मजबूत होण्यासाठी..
* चांगल्या सवयी – स्वावलंबन, कामे वेळेआधी पूर्ण करणे, कामाचे पूर्वनियोजन, पूर्वअभ्यास, मृदू वक्तव्य या चांगल्या सवयींचा जाणीवपूर्वक स्वीकार करणे.
* स्वयंशिस्त – कामाची पद्धत, वक्तशीरपणा, आíथक व्यवहार यांबाबत शिस्त पाळणे.
* सकारात्मक वृत्ती – आलेली संधी, झालेली टीका, प्रशंसा, नवीन बदल या सर्वाकडे सकारात्मक वृत्तीने पाहणे गरजेचे असते. यासाठी आनंदी, सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात राहणे उत्तम.
* मेहनत – ध्येय आणि ध्येयपूर्ती यांच्यामधल्या अवधीत कराव्या लागणाऱ्या मेहनतीसाठी कायम मनाची तयारी ठेवायला हवी.
* रागावर नियंत्रण – कठीण प्रसंगातही मनस्थिती स्थिर ठेवून निर्णय घेण्यासाठी रागावर नियंत्रण गरजेचे आहे. यामुळे स्वत:चा आणि दुसऱ्याचा आदर राखत विवेकाने निर्णय घेणे शक्य होते.
* कार्यमग्नता – मनाला सतत विधायक कामात गुंतवून ठेवल्याने नकारात्मक विचार दूर सारणे शक्य होते.
* प्राधान्यक्रम – प्रगतीसाठी उद्दिष्ट, ध्येय्यपूर्ती, कर्तव्य यांना प्राधान्यक्रम द्यायला हवा. आपल्यावरून दुसऱ्याला ओळखायला शिकणे महत्त्वाचे. या गोष्टी जाणीवपूर्वक अंगी बाणवल्याने, कामाच्या ठिकाणी, नतिक मूल्यांची आणि नतिक तत्त्वांची जपणूक शक्य होते.

वर्तणुकीचे संकेत
शैक्षणिक गुणवत्ता आणि अनुभव यांच्यासोबत वर्तणुकीचे संकेत पाळणे स्वयंप्रगतीसाठी आवश्यक ठरते.
* उत्पादकता- कामाचा दर्जा राखत सोपवलेले काम वेळेत पूर्ण करणे हा प्रत्येक कर्मचाऱ्याकडून अपेक्षित असलेला वर्तणुकीबाबतचा मूलभूत संकेत आहे. सातत्याने आणि वेगाने काम करत उच्चतम उत्पादकता साधता येते.
* मेहनती वृत्ती – कामाच्या पूर्ततेसाठी शारिरीक आणि मानसिक मेहनत घेणे अपेक्षित असते. याचा लाभ कंपनीच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत प्रगतीसाठी होत असतो.
* वक्तशीरपणा – कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचणे, कामे वेळेत पूर्ण करणे यामुळे कार्यालयीन शिस्त राखली जाते.
* लवचीकता – बदलत्या काळाप्रमाणे कार्यालयीन वातावरणात, कामाच्या स्वरूपात बदल होत असतात. उदा. नवीन तंत्रज्ञान, बदलती सरकारी धोरणे, व्यवस्थापनातील बदल इत्यादी. या बदलांशी जुळवून घेण्याची बौद्धिक आणि मानसिक लवचीकता अंगी बाणवायला हवी.
* पदज्येष्ठता – मुख्य म्हणजे कामाच्या ठिकाणी असलेल्या वरिष्ठ व्यक्तींच्या अधिकाराची आणि हुद्दय़ांची उतरंड लक्षात घेऊन कामासंदर्भातील निर्णय घेणे उत्तम.
* गॉसिप टाळा- कामाच्या ठिकाणी, कामाव्यतिरिक्त अतिप्रमाणात अवांतर गप्पा या नेहमीच गरसमज आणि अफवा पसरवतात. या बाबी व्यक्तिगत प्रगतीसाठी आणि कंपनीच्या प्रगतीला मारक ठरतात. तेव्हा अशा वायफळ गप्पा टाळणेच उत्तम.