गेल्या दोन दशकांत, जागतिकीकरण, वाढते शहरीकरण आणि झपाटय़ाने प्रगती करणारे माहिती तंत्रज्ञान यांमुळे नवनवीन रोजगार क्षेत्रे विकसित झाली आणि नवनव्या उद्योग संधी निर्माण झाल्या. कामाचा आवाका वाढला आणि कामाचे स्वरूप अधिक गतिमान होत गेले. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी रोजच्या रोज जाऊन निर्धारित वेळात काम करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घरच्या घरी तेच काम पूर्ण करण्याचा सोयीस्कर आणि रास्त पर्याय पुढे आला आणि ‘वर्किंग फ्रॉम होम’ ही नवीन कार्यपद्धती लोकप्रिय झाली.
हा पर्याय कोणासाठी?

पालक – मुलांच्या संगोपनात गुंतल्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊ न शकणारे आई-बाबा.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

अपंग – जन्मत: किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दररोज जाणे असमर्थ ठरते आणि बऱ्याचदा ‘वर्किंग फ्रॉम होम’ सेवेचा पर्याय

निवडताना दिसतात.

सेवानिवृत्त व्यक्ती – स्वेच्छानिवृत्ती किंवा निवृत्ती स्वीकारल्यानंतर रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी घरी राहून काम करायला पसंती दिली जाते.

गृहिणी- नोकरी न करता पूर्णवेळ घरात असणाऱ्या स्त्रियाही घरखर्चाला हातभार म्हणून किंवा वेळ व्यतीत करण्यासाठी हा मार्ग अवलंबतात.

विद्यार्थी- महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थीस्वत:चे किरकोळ खर्च भागवण्यासाठी अनेकदा हा पर्याय स्वीकारतात.

आवश्यक कौशल्ये

 तत्परता – ‘वर्किंग फ्रॉम होम’ कार्यपद्धतीत कामाच्या वेळा निश्चित नसल्या तरीही स्वीकारलेले काम सांगितलेल्या वेळेत तत्परतेने पूर्ण करणे आवश्यक ठरते.

नियोजन – घरून काम करताना घरातील अन्य जबाबदाऱ्या ही पार पाडणे अपेक्षित असते, अशा वेळी कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामाची आणि वेळेची विभागणी करणे हिताचे ठरते.

 संवादकौशल्य – घरून काम करीत असताना काम देणाऱ्या व्यक्तींशी त्यांच्या कार्यालयातील अन्य व्यक्तींशी, परिणामकारक संवाद साधण्यासाठी उत्तम संवादकौशल्य विकसित करणे गरजेचे ठरते.

 तंत्रकौशल्य – संगणक, आणि तत्संबंधी अन्य उपकरणे उत्तमरीत्या हाताळता येणे, तसेच त्यांच्यातील बिघाड ओळखण्याची आणि दुरुस्त करण्याचे जुजबी ज्ञान आवश्यक असते, कारण घरून काम करीत असताना सहकारी आणि तंत्रज्ञांची तत्काळ मदत घेणे शक्य नसते.

 स्वयंशिस्त – घरातून काम करताना, कार्यालयीन शिस्त पाळावी लागत नसली तरी कामाचा दर्जा आणि वेळेत काम पूर्ण करण्यासाठी स्वयंशिस्तीचे पालन आवश्यक ठरते.

कार्यपद्धतीचे लाभ

वेळेची बचत – काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा जाण्या-येण्याचा वेळ, दळणवळण सेवसाठीचा खर्च आणि दगदग या सर्व गोष्टी सहज टाळल्या जाऊ शकतात.

लवचीकता – घरच्याघरी काम करताना प्रापंचिक जबाबदाऱ्या निभावतानाच आपल्या प्राधान्यक्रमानुसार आणि वेळेनुसार काम करता येते.

उपलब्धता – आधुनिक तंत्रज्ञांनाच्या आधारे राहत्या ठिकाणापासून किती तरी लांब, काही वेळा दुसऱ्या राज्यातील किंवा देशातील कामाची संधीही उपलब्ध होऊ शकते. नोकरी देणाऱ्या आणि नोकरी करू इच्छिणाऱ्या दोघांसाठीही ही जमेची बाब ठरते.

कामाचा दर्जा उंचावतो – प्रवास, कार्यालयीन डावपेच व राजकारण, सहकाऱ्यांची अनास्था आदी फुटकळ बाबतीत वेळ वाया न गेल्याने एकाग्रतेने काम करता येते आणि त्यामुळे कामाचा दर्जाही उंचावतो.

स्वयंरोजगाराच्या संधी

व्हच्र्युअल असिस्टंट– या व्यक्ती कंपनीच्या कार्यालयात न जाता, घरूनच कंपनीला कारभारविषयक सेवा पुरवतात. उदा. कंपनीचे अकाउंट्स सांभाळणे, डाटा एन्ट्री, ऑनलाइन रिसर्च, ग्राहक कंपनीतर्फे ईमेल्स पाठवणे, सहल कंपन्यांसाठी रीसर्च वर्क, उद्योग क्षेत्रातील संशोधन करणे इत्यादी.

मेडिकल ट्रान्सस्क्रिप्शनिस्ट – आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणे. वैद्यक तज्ज्ञांच्या ध्वनिफीतींचे लेखी माहितीत रूपांतरण करणे.

सहल आयोजक – इंटरनेटचा उपयोग करून निरनिराळ्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळवणे आणि ऑनलाइन बुकिंग सेवेमार्फत आरक्षण करणे, यांतून ग्राहकांच्या आíथक क्षमता लक्षात घेऊन सहल आयोजक म्हणूनही रोजगार मिळू शकतो.

भाषांतरकार/ लेखक/ लेखनिक- संगणक आणि इंटरनेट सुविधा, भाषाकौशल्य अवगत असेल तर या कार्यक्षेत्रात घरच्या घरी रोजगार मिळवता येतो.

शिक्षक – आपले शिक्षण आणि कामाचा पूर्वानुभव यांचा उपयोग जर एखाद्या अभ्यासविषयाचे प्रशिक्षण देण्यासाठी करता आला तर सध्या प्रचलित असलेल्या ‘ई लìनग’ कार्यक्षेत्रातही रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
पूर्वनियोजन हवे!
योग्य आणि ठरावीक जागा – ‘वर्किंग फ्रॉम होम’ कार्यपद्धतीची परिणामकारकता वाढवण्यासाठी कामाची योग्य आणि ठरावीक जागा निश्चित करायला हवी. कार्यालयात कामाची प्रत्येकाची जागा ठरवून दिलेली असते. त्याचप्रमाणे ‘वर्किंग फ्रॉम होम’ या प्रकारात घरात एखादी विवक्षित जागा कामासाठी राखून ठेवणे उत्तम असते. बसण्याची व्यवस्था, कामाशी निगडित साहित्य-सामग्री, उपकरणे यांचे संच यासाठीही जागा सुनिश्चित असावी.

कामाच्या वेळा -‘वर्किंग फ्रॉम होम’ या प्रकारात कामाची सुरुवात करण्याच्या वेळेचे तसेच काम बंद करण्याच्या वेळेचे बंधन नसल्याने, काम वेळेत पूर्ण होण्यासाठी आपण स्वत:च काम करण्याची दिवसभरातील वेळ निश्चित करायला हवी आणि त्याचे पालनही करायला हवे.

जाहिरातींच्या सत्यासत्यतेची पडताळणी

रोजगार संधी देऊ करणारी कंपनी, मान्यताप्राप्त तसेच नोंदणीकृत असावी.

जाहिरातीत कंपनीचे नाव, पत्ता, ई-मेल नमूद केलेले असणे आवश्यक आहे.

रोजगार संधींबद्दल आलेल्या शंकांचे निरसन कंपनीकडून होणेआवश्यक आहे.

अन्य नेमणुकीप्रमाणेच ‘वर्क फ्रॉम होम’ प्रकारच्या कामासाठीही कंपनीने करारपत्र किंवा नेमणुकीचे पत्र देणे आवश्यक आहे.

मुख्य म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ प्रकारातील रोजगार संधी मिळवण्यासाठी नेमणूक करणाऱ्या कंपनीला, कोणत्याही स्वरूपाची आगाऊ रक्कम देण्याची गरज नसते, हे इच्छुक उमेदवाराने कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Story img Loader