सर्टििफकेट कोर्स इन केअर अॅण्ड कन्झर्वेशन ऑफ मॅन्युस्क्रिप्ट, बुक्स अॅण्ड आर्काइव्ह.
नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया या संस्थेने सुरू केलेला दुसरा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम म्हणजे सर्टििफकेट कोर्स इन केअर अॅण्ड कन्झर्वेशन ऑफ मॅन्युस्क्रिप्ट, बुक्स अॅण्ड आर्काइव्ह. या अभ्यासक्रमात पुस्तके, ग्रंथ, ऐतिहासिक कागदपत्रे, हस्तलिखिते यांचे शास्त्रीयदृष्टय़ा संवर्धन, संरक्षण, दुरुस्ती, साठवणूक, हाताळणी आणि जतन याचे तंत्र शिकवले जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी आठ आठवडे असून हा अभ्यासक्रम जुल-ऑगस्ट आणि नोव्हेंबर-डिसेंबर अशा दोन सत्रांत आयोजित केला जातो. कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधराला हा अभ्यासक्रम करता येतो. तथापि, विज्ञान पदवीधराला प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. इच्छुकांची निवड गुणवत्तेनुसार केली जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in